ताज्या घडामोडी

यापुढे उपोषणाची लढाई शक्यतो बंद, अंतरवालीतील उपोषण थांबवण्याची घोषणा करण्याची व मनोज जरांगें काढता पाय घेण्याची शक्यता 

यापुढे उपोषणाची लढाई शक्यतो बंद, अंतरवालीतील उपोषण थांबवण्याची घोषणा करण्याची ब मनोज जरांगें काढता पाय घेण्याची शक्यता

संभाजी नगर (प्रतिनिधी)

   मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी अखेर त्यांचं उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आसून यापुढे शक्यतो आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली.  उपोषणकर्त्यांशी चर्चा करून यासंबंधित पुढील निर्णय घेण्यात येईल असंही जरांगे यांनी स्पष्ट केल्याने उपोषण थांबवून ते आंदोलनातून काढता पाय घेण्याची शक्यता आहेत.

   मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू असून या दरम्यान जरांगे यांची तब्येत खालावली. तरीही शासन स्तरावरून या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसून आलं. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एवढे दिवस आंदोलन करावं लागेल असं वाटलं नव्हतं असं मनोज जरांगे म्हणाले.

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी मंगळवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलं असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होतं. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटू नये यासाठी उपोषण मागे घेनार असल्याचं जरागे यांनी स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका

मनोज जरांगे म्हणाले की, “खरं आहे ते टिकत नाही, जे हक्काचं आहे तेच देत नाहीत. फडणवीस मराठा आरक्षणावर होय पण म्हणत नाहीत आणि नाहीपण म्हणत नाहीत. ते गप्प बसलेत याचा अर्थ त्यांच्या मनात मराठ्यांविषयी किती द्वेष आहे हे कळले. त्यांच्या मनात किती सूड भावना आहे हे समोर आलं.”

आमच्या सोबत बेइमानी केली तर पाच वर्षे सरकार नीट चालू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणार की नाही हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. पण आता आंदोलन थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद

मागील दीड वर्षा पासून मराठा आरक्षण मागणी साठी मनोज जरांगे सतत उपोषण करत आहेत मात्र त्यांची भूमिका ही सतत बदलती व मराठा समाजाची दिशभूल करणारी दिसू लागल्याने या वेळच्या उपोषणास समाजाचा पहावा तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून की काय मनोज जरांगे यांनी उपोषणाची सांगता करून काढता पाय घेन्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!