ताज्या घडामोडी

पोलीस अधीक्षक नवनीत कावतांचे फर्मान, आडनाव घ्यायचं नाही, नावाने हाक मारायची

पोलीस अधीक्षक नवनीत कावतांचे फर्मान, आडनाव घ्यायचं नाही, नावाने हाक मारायची

बीड (प्रतिनिधी)

    बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि सौहार्द नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने सराकरी अधिकारी, पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच या जातीयवादाचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वपूर्ण फर्मान काढले आसून बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना एकमेकांना आडनांव ऐवजी पहिल्या नावाने हाक मारणे बंधनकारक करण्यात आले आहे..

   मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीपासून मराठी विरुद्ध वंजारी हा सुरु झालेला वाद देशमुख हत्याप्रकरणानंतर आणखी उफाळला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि सौहार्द नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सराकरी अधिकारी, पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच या जातीयवादाचा फटका बसत आहे.

   या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक अनोखा आदेश लागू केला. यापुढे पोलिसांनी एकमेकांना फक्त पहिल्या नावानेच बोलवायचे, आडनाव घ्यायचे नाही, असे आदेशात म्हटले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जातीय वातावरण ढवळून निघाले आहे. पोलिस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असून ते आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप झाला. त्यामुळे जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश लागू केला आहे. या आदेशाचे आता बीड जिल्ह्यात काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागेल.

     मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात लक्षणीयरित्या दिसून आला होता. या आंदोलनाच्या काळात बीडमध्ये काही आंदोलकांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असे जातीय ध्रुवीकरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर वंजारी समाजात तीव्र पडसाद उमटले होते. विधानसभा निवडणुकीतही हा जातीय वाद पाहायला मिळाला होता. अनेक शाळांमध्ये लहान मुलांमध्येही आपापसात जातीय भेदभाव झाल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या होत्या. त्यामुळे बीडमधील सामाजिक परिस्थितीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्याने नवनीत कावत यांच्या या फर्मान ची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!