दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी*
दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी
अंबाजोगाई – (प्रतिनिधी)
अंबाजोगाई ते चनई रोडवर चनई गावा नजिकच दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना थोडा वेळा पूर्वी घडली.
दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. ऋषिकेश मधुकर भुरे (वय अंदाजे 25, रा. सनगाव, ता. अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अपघातात आयान इरफान शेख (वय 20 रां चनई) हा युवक गंभीर जखमी झालेला असून या युवका वर स्वाराती रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी लातूर ला हलवण्यात आले आहे त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची खात्री लायक माहिती आहे.
