परळीतल्या भास्कर केंद्रे नावाच्या पोलिसाकडे १५ जेसीबी, १०० राखेचे टीपर _ आ सुरेश धस यांचा गौप्य स्फोट
परळीतल्या भास्कर केंद्रे नावाच्या पोलिसाकडे १५ जेसीबी, १०० राखेचे टीपर _ आ सुरेश धस यांचा गौप्य स्फोट
बीड (प्रतिनिधी )
गेल्या अनेक वर्षांपासून काही पोलीस बीड आणि परळीमध्ये ठाण मांडून बसले आसून परळी मधील भास्कर केंद्रे नामक पोलीस कर्मचाऱ्या कडे 15 जे सी बी व 100 राखेचे टीप्पर व मटका व्यवसायका सोबत भागीदारी असल्याचा आरोप आ सुरेश धस यांनी केला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यास बदली अधिनियम तीन वर्षांचा आहे, चार वर्षांपुढे तिथे राहायचं असे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते मात्र २०-२० वर्षे अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी कसे काय काम करू शकतात? असा सवाल उपस्थित करून भास्कर केंद्रे हा पोलीस कर्मचारी १५ वर्षांपासून परळीमध्ये असल्याचे सांगत त्याच्याकडे १५ जेसीबी, १०० राखेचे टीपर आणि तेथील मटका व्यावसायिकासोबत भागिदारी आहे, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सौरभ भोंडवे खून प्रकरण, महादेव मुंडे खुनाची चौकशी, भगिरथ बियाणी खून प्रकरण तसेच बीडमधील पोलिसांच्या बदल्यांचा विषय आदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तसेच परळी नगर परिषदेचे ऑडिट व्हावे, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले, परळीतील राखेचे साठे जप्त करण्यात यावेत. राखेचे डेपो कुणाचे याची नावे मी समोर आणणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील राखेची वाहतूक बंद झाली. मात्र आमच्या जिल्ह्यात कशी काय चालू आहे, असा सवालही धस यांनी उपस्थित केला. बीड जिल्ह्यात आणि परळीत अनेक वर्षांपासून काही पोलीस अधिकारी नोकरीला आहेत. त्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे? भास्कर केंद्रे हा पोलीस १५ वर्षांपासून परळीत आहे. त्याच्याकडे १५ जेसीबी, १०० राखेचे टीपर आणि तेथील मटका व्यावसायिकाबरोबर त्याची भागिदारी आहे, असे आरोप धस यांनी केले. मी केवळ सांगतोय म्हणून तुम्ही ऐकू नका, तुम्ही एकदा परळीत जाऊन बघा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
परळीत एकाच रस्त्याची पाच पाच वेळा बीले घेतलेली आहेत. खून प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णु चाटे याने ४६ कोटी रुपये बील घेतले आहे, असा आरोपही धस यांनी केला. वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतच्या आरोपींना फरार करण्यास कुणी कुणी मदत केली, हे तपासून संबंधित पोलिसांवर कारवाई करा. चौकशी अंती दोषी आढळले तर त्यांना बडतर्फ करा, अशी मागणीही धस यांनी केली.
