ताज्या घडामोडी

खरचं बीडचा ‘बिहार’ झालाय? पोलीस स्टेशनमध्येच 10- 12 जणांच्या टोळीने  राडा घालत गोरक्षका वर हल्ला

खरचं बीडचा ‘बिहार’ झालाय? पोलीस स्टेशनमध्येच 10- 12 जणांच्या टोळीने  राडा घालत गोरक्षका वर हल्ला

बीड (प्रतिनिधी)

    राज्यात बीड जिल्हा हा गुन्हेगारीमुळे चर्चेचा विषय बनला आसून बीडच्या चकलंबा गावात पोलीस स्टेशनमध्येच गोरक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली आसून जखमी गोरक्षकावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे

    गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात अनेक गुन्हेगारी घटना घडत असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असताना जिल्ह्यात अपहरण, गोळीबार, मारहाण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहे. बीड पोलिस स्थानकातही नागरिक सुरक्षीत नसल्याचे आता समोर आले आहे. बीडच्या चकलंबा गावात रात्री गोरक्षकावर पोलीस स्टेशनमध्ये दहा ते बारा जणांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात गोपाळ मधुकर उणवणे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून गोरक्षकावर हल्ला करणाऱ्या कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण केली अशा प्रत्यक्षदर्शी तरुणांना सांगितलं.

पोलीस स्टेशनमध्येच मारहाण

गोपाळ मधुकर उनवणे या तरुणाने या अगोदर गोवंश तस्करी करणाऱ्यांच्या गाड्या अडून पोलिसांना माहिती दिली होती. त्याचाच राग मनात धरून पोलीस स्टेशनमध्येच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपीवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजप युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तप्रसाद जाधव यांनी दिला आहे.

आरोपींच्या अटकेसाठी बाजारपेठ बंद

    बीडच्या चकलांबा येथे तरुणाला  जमावाकडून मारहाण झाल्याने तरुण यात जखमी झाला असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान तरुणाच्या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बीड जिल्ह्यातल्या कायदा-सुव्यवस्थेवर फक्त विरोधकच नाहीत, तर बीड जिल्ह्यातील खासदार आमदार देखील सध्या चिंता व्यक्त करत आहे. त्यामुळे खरोखर बीडचा बिहार होत आहे की काय? हा प्रश्न आहे. कारण बिहारहूनही भयावह परिस्थिती बीडची झाली आहे. आता तर पोलिस स्थानकात हल्ला झाल्याने पुन्हा नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बीड जिल्ह्यात 10 महिन्यांत 36 खून

बीड जिल्ह्यात 10 महिन्यांत 36 खून झाले आहेत. तसेच खुनाचा प्रयत्न केल्याच्याही 168 घटनाही घडलेल्या आहेत. चाकू, तलवारी, लोखंडी रॉड, बंदूक आदी हत्यारे घेऊन एकमेकांवर वार.. गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे 498 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच 136 बलात्कार अन् अत्याचार,386 विनयभंगाच्या घटना समोर आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!