29 जानेवारी पासून अंबाजोगाई बस स्थानकाचे वंजारी वसतिगृहात स्थलांतर
29 जानेवारी पासून अंबाजोगाई बस स्थानकाचे वंजारी वसतिगृहात स्थलांतर
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बीड विभागातील अंबाजोगाई वस स्थानकाचे कॉक्रिटीकरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे तर्फे करण्यात येणार आहे. सदर चे कॉक्रिटीकरणाचे काम दि. २९.०१.२०२५ पासुन सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे दि. २९.०१.२०२५ पासुन अंबाजोगाई बस स्थानक ते अंबाजोगाई आगार मार्गावर (योगेश्वरी उद्यान समोर) शंकर महाराज वंजारी वस्तीगृहाचे मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात बस स्थानका करिता निवारा शेड उभारण्यात आलेले आहे.
दि.२९.०१.२०२५ पासुन अंबाजोगाई येथुन जाणा-या येणा-या बसेस अंबाजोगाई बस स्थानक ते अंबाजोगाई आगार मार्गावर (योगेश्वरी उद्यान समोर शंकर महाराज वंजारी वस्तीगृहाचे मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात बस स्थानका करिता निवारा शेड येथुन मार्गस्थ होतील.
31 विभाग
