मुख्यमंत्र्यांची भेट, मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यावर सोडून राजीनाम्याच्या चर्चेवर ना धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांची भेट, मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यावर सोडून राजीनाम्याच्या चर्चेवर ना धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
मुंबई (प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेउन या भेटीत त्यांनी काही कागदपत्रे पवार यांना दिले व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावर धनंजय मुंडे यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
त्याआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली. सध्या सुरु असलेल्या वादावर ही भेट झाली असण्याची शक्यता आहे. दवाखान्यात काही टेस्ट करायच्या आहे यासाठी जायचे म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठक देखील अर्ध्यावर सोडली.
माध्यामांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, “मी राजीनामा द्यावी की नाही, मी दोषी आहे की नाही हे आदरनीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करावं. राजीनाम्याच्या विषयावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या आहेत. ज्या कागदपत्रासह त्यांनी ही भेट घेतली यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस स्पष्ट
उत्तर देतील. त्यांनीच यावर उत्तर त्यांनी ही माझीही इच्छा आहे”, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
आमदार संदीप क्षीरसागरांच्या आरोपांना उत्तर
शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसाखर यांनी आरोपी कृष्णा आंधळेसोबत काही बरं-वाईट झालं असेल, असा संशय उपस्थित केला होता. यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, “संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधेळेचे काही संबंध असतील. याशिवाय त्यांच्याकडे अशी माहिती कुठून आली. कृष्णा आंधळेचं काय झालं हे पोलिसांना माहिती नाही, हे त्यांना कसं माहित झालं. अशा बातम्या पेरल्या जातात”, असाही आरोपी धनंजय मुंडे यांनी केला.
माध्यमांवरही टीका
माध्यमांमधून होणाऱ्या सततच्या आरोपांवरही धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. “मागील काही दिवस माध्यमांमध्ये बीड पलिकडे दुसरं काहीच चालू नाही. माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. बीडमध्ये माध्यमांच्या बाबतीत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो मान आदर आहे तो आजही आहे, मात्र कुठे तरी कमी होत चालला आहे. आपण पत्रकार म्हणून काय खरं काय खोटं हे तपासलं पाहिजे.
“मीडिया ट्रायल झालं पाहिजे या मताचा मी आहे. सरपंच संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही माझी पहिल्या दिवसांपासून भूमिका आहे”, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
