ताज्या घडामोडी

अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दोन वाहनांना वित्त पुरवठा करून उद्योजकांना आर्थिक ताकत देण्याचा प्रयत्न 

अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दोन वाहनांना वित्त पुरवठा करून उद्योजकांना आर्थिक ताकत देण्याचा प्रयत्न 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
     अंबाजोगाई शहरातील अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दोन उद्योजकांना आरई सीएनजी अ‍ॅटो व TATA” कंपनी चे “LOADING ACE GOLD 2.0 (CNG+PETROL) ऑटो  साठी वित्त पुरवठा करून उद्योजकांना आर्थिक ताकत देत त्यांना बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
     आंबाजोगाई शहरातील अलखेर नागरी सहकारी पतसंस्था ही माजी उप नगराध्यक्ष शेख रहीम भाई व चेअरमन शेख अमर फारूक यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 20 वर्षा पासून शहरातील बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. अंबाजोगाई शहरात गेल्या वीस वर्शाच्या कालखंडात हजारो बेरोजगार तरुणांना व व्यवसायिकांना स्वावलंबी बनविण्याचे काम करण्यात आले आहे. ही पतसंस्था आर्थिक कमाईसाठी नाही तर समाजातील जे आर्थिक दारिद्रय आहे ते संपविण्यासाठी अल्पशा सेवा शुल्कावर कर्ज वितरण करुन रोजगारासाठी हातभार लावत असते.
      गुरुवारपेठ भागातील बेरोजगार तरुण युवक जावेद जुम्मा रेगीवाले यांना संस्थेच्या वतीने आरई सीएनजी अ‍ॅटो व
“चंद्रभागा अक्वा वाटर चे मालक विशाल तुळशीराम मारवाळ” यांना “TATA” कंपनी चे “LOADING ACE GOLD 2.0 (CNG+PETROL)” या ऑटो चे वितरण
 दै.वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते व
पतसंस्थेचे संचालक मा.शेख रिज़वान सर”
यांच्या हस्ते ऑटोच्या अधिकृत चाव्या देऊन करण्यात आले. यावेळी अलखैर पतसंस्थेचे अध्यक्ष शेख उमर फारूक सर, निरीक्षक आर.बी.हिंगे व मॅनेजर-सय्यद रऊफ इंजि. अकीकोदद्यीन काझी, आयजोद्यीन काझी, तुळशीराम मारवाळ, शेख इर्शाद भाई, विशाल मारवाळ, फेरोज पठाण स्टारकिराणा शॉप चे मालक शेख अब्दुल रऊफ साहेब, विशाल मारवाड़,
आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!