*वृत्त वाहिन्याच्या धर्तीवर रंगला रौप्यमहोत्सवी बालझुंबड-२०२५ चा बक्षीस वितरण सोहळा*
*वृत्त वाहिन्याच्या धर्तीवर रंगला रौप्यमहोत्सवी बालझुंबड-२०२५ चा बक्षीस वितरण सोहळा*
*विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्तिथीत विजेत्यांना झाले बक्षीस वितरण*
अंबाजोगाई (वार्ताहर):- अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने सलग २५ व्या वर्षी आयोजित रौप्य महोत्सवी बालझुंबड-२०२५, आनंदोत्सव विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा आज रविवार दि २६ जानेवारी रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला . या उपक्रमाचे हे सलग पंचवीसावे वर्ष असल्याने हा रौप्यमहोत्सवी असा बक्षीस वितरण सोहळा वृत्त वाहिन्यांच्या पुरस्कार सोहळ्याच्या धर्तीवरच संपन्न करण्यात आला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती सुरेखा सिरसाट, डॉ पाटील,संकेत मोदी, दिनकर जोशी, दिनेश भराडीया, संकाये अप्पा, सुधाकर टेकाळे यांच्यासह सचिन जाधव हे उपस्थित होते.
या स्पर्धेत इयत्ता १ली ते ४ थि, ५ वी ते ७ वी , तसेच ८ वी ते १० वी असे तीन गट तयार करण्यात आले होते .ज्यामध्ये पीपीटी स्पर्धेत ५ वी ते ७ वी या गटातून न्यू व्हिजन स्कुलच्या विश्वजित भागवत चाटे, चि अथर्व सुरेश गायकवाड या विद्यार्थ्यांचा प्रथम ,चि प्रणव प्रल्हाद फड , चि विनायक गंगाधर अकलोड यांचा द्वितीय तर कु समृद्धी अर्जुन पवार, चि कार्तिक नंदकिशोर चिताडे या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला .
क्विझ कॉम्पिटीशन स्पर्धेत इयत्ता ८ वी ते १० वी गटातून प्रथम क्रमांक न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या चि शिवेन्द्र सिन्हा, कु आदिती लोमटे यांनी मिळवला ते व्दितीय क्रमांक स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिराच्या सार्थक अंबाड, श्रेयस स्वामी तर तृतीय क्रमांक वसंतराव काळे पब्लिक स्कुलचे नितीशा नरेंद्र काळे, नैतिक नरेंद्र काळे या विद्यार्थ्यांनी मिळवला.तर इयत्ता ५वी ते ७वी गटातून स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिरचे विद्यार्थी चि यश अमोल राडीकर, हर्ष प्रसन्न दिग्रस्कर, तर द्वितीय श्रेणीतन्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे विद्यार्थी कु रिद्धी सचिन शास्त्री, चि श्रेयस हनुमंत तर तृतीय क्रमांक पार्थ बाळासाहेब कदम,ईशान मकरंद पत्की या विद्यार्थ्यांनी आपले नाव झळकावले .
वैयक्तिक नृत्य स्पर्धेत इयत्ता १ली ते ४ ठी गटातून प्रथम क्रमांक कु मानवी प्रभाकर पतंगे, द्वितीय कु स्वरा स्वप्नील यादव,तर तृतीय क्रमांक कु काव्या किशोर मोटे या विद्यार्थ्यांनी मिळवला . वैयक्तिक नृत्य स्पर्धेत इयत्ता ५वी ते ७ वी गटातून प्रथम क्रमांक अंशुल गिरीश बिडवे, द्वितीय कु स्वरनिका नरेंद्र वांजरखेडकर तर तृतीय क्रमांक वसुंधरा प्रकाश काशीद या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. इयत्ता ८ वी ते १० वी गटातून प्रथम क्रमांक रणवीर चंद्रकांत देशमुख, सिद्धता राजेश जाधव द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक विराज परेश वाघडोळे या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले .
रंगभरण स्पर्धेत १ते४ गटातून कु आराध्या प्रभाकर मुंडे,रमणी शैलेश बाकळे प्रथम तर द्वितीय श्रीनिधी देशमाने, सई योगेश कुलकर्णी त्याचबरोबर तृतीय क्रमांक शंभूराजे बाबासाहेब देशमुख, कु जागृती गौरव लामतुरे या विद्यार्थ्यांनी आपले व आपल्या शाळेचे नाव चमकवले. इयत्ता ५वी ७वी गटात चि अभंग गणेश कदम, आयुष श्रीकृष्ण गोरे,अर्जुन तुकाराम राजुरे ८वी ते १० वी या गटातून चि रितेश लक्ष्मण काळे,समर्थ संजय व्यवहारे, मृणाल किरण कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवत आपले नाव उज्वल केले .
समूह नृत्य स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी गटातून प्रथम क्रमांक प्रमोदजी महाजन इंग्लिश स्कुल , द्वितीय क्रमांक सिनर्जी नॅशनल स्कुल घाटनांदूर तर तृतीय क्रमांक स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर या शाळेतील मुलांच्या समूहाने मिळवला . ५वी ते ७ वी या गटातून प्रथम क्रमांक सिनजी नॅशनल स्कुल , द्वितीय क्रमांक प्रमोदजी महाजन इंग्लिश स्कुल, तृतीय क्रमांक स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर समूहाने समूह नृत्य स्पर्धेत आपल्या शाळेचे नाव उज्वल केले . या बक्षीस वितरण कार्यक्रमात मानवविकास मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विशेष नृत्याचा विशेष गौरव करण्यात आला. तर इयत्ता ८ वी ते १० वी गटातून प्रथम क्रमांक श्रीमती गोदावरी कुंकुलोळ योगेश्वरी नूतन कन्या विद्यालय, प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कुल,तर तृतीय क्रमांकाने न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या बक्षीस वितरण समारोहात रोटरी क्लबचे धनराज सोळंकी यांच्यासह त्यांचे सहकारी , रॉट्रॅक्ट क्लब, इनरव्हिल क्लबचे सदस्य, योगेश्वरी मल्टिस्टेटचे संचालक सुधाकर टेकाळे, ऍड अनिल लोमटे,अन्वरभाई, शेख मुक्तार , यांच्यासह अन्य संचालक तसेच पंडित हुलगुंडे, प्राचार्य रेंजो आर चंद्रन,अकबर पठाण, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे विजय रापतवार , विष्णू सरवदे , सचिन जाधव, धम्मा सरवदे, शाकेर काझी, जावेद गवळी, मतीन जरगर यांच्या हस्ते बालझुंबड या स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. हा रौप्य महोत्सवी सोहळा संपन्न करण्यासाठी बालझुंबड चे समन्वयक राजेश कांबळे, मुख्याध्यापक विनायक मुंजे, आनंद टाकळकर,अप्पा चव्हाण यांच्यासह जोधप्रसादजी मोदी विद्यालय, न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
