19 वर्षांचा मुलगा 15 वर्षांची मुलगी प्रेमीयुगुलाने ट्रेनसमोर उडी घेत संपवलं जीवन
19 वर्षांचा मुलगा 15 वर्षांची मुलगी प्रेमीयुगुलाने ट्रेनसमोर उडी घेत संपवलं जीवन
मुंबई (प्रतिनिधी)
मुंबईच्या विक्रोळी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आसून एका प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेत आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचं वय 19 तर मुलीचं वय अवघं 15 वर्षे आहे.
दोघांनी अशाप्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय मुलगा आणि 15 वर्षांची मुलगी, याचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांनीही लग्न करून संसार थाटायचा होता. पण घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. शिवाय मुलगीही अल्पवयीन होती. घरातून होणारा विरोध पाहता, दोघांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी विक्रोळी रेल्वे स्टेशन परिसरात एका एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे.
19 वर्षीय मुलगा आणि 15 वर्षीय मुलीनं अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
