आयटी क्षेत्रात स्पर्धा वाढली नोकरी मिळण्यासाठी तरुणांची धडपड भल्या मोठ्या रांगाच रांगा
आयटी क्षेत्रात स्पर्धा वाढली नोकरी मिळण्यासाठी तरुणांची धडपड भल्या मोठ्या रांगाच रांगा
पुणे (प्रतिनिधी)
तरुणांच्या हाताला काम नाही. नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी मोठी स्पर्धा आहे. खाजगी नोकऱ्यांची संधी आहे पण आता तिथे देखील स्पर्धा खूप वाढली आहे. असे एक ना अनेक सध्या राज्यातील बेरोजगार तरुणांपुढे आ वासून उभे आसल्याने पुण्यात नोकरी मिळवण्या साठी आय टी क्षेत्रा मधील तरुणांच्या रांगा च रांगा लागलेल्या दिसून येत आहेत
नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची मोठी धडपड होत आहे. त्यातही नोकरी मिळालीच तर कायमस्वरुपी टिकेल की नाही याची शक्यता सांगणे अवघड आहे. तरुणांनी आयटी क्षेत्रात पाऊल ठेवत तिथे नोकरी करण्याचे ठरवले. आता तिथेही मोठी स्पर्धा निर्माण झाली असून कायमस्वरुपी नोकरीची श्वास्वती राहिलेली नाही. बेरोजगार तरुणांची वाढती बेरोजगाराची संख्या दर्शवणारे एक विदारक स्थिती एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभियंता पदाची नोकरी मिळवण्यासाठी तब्बल ३ हजार तरुणांची रांग लागल्याचे सांगण्यात आले आहे.
हा व्हायरल झालेल्या व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टा भागातील असल्याचे सांगण्यात आले आहे. येथील एका आयटी कंपनीच्या गेटबाहेर अभियंत्याच्या जागेसाठी तरुणांची भलीमोठी रांग लागल्याची सांगितले जात आहे. तीन हजारांहून अधिक तरुण या रांगेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही रांग पाहून बेरोजगाराची भिषणात लक्षात येते. आयटी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची मोठी धडपड यातून दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. राज्यातील बेरोजगाराची परिस्थिती लक्षात घेत तरुणांना महिन्याला बेरोजगारी म्हणून काही भत्ता देणार असल्याचे आश्वासनाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
