ताज्या घडामोडी

वाल्मिक कराड यांचा दरबार असलेल्या जगमित्र कार्यालयाची सूत्रं यापुढे अजय मुंडेंच्या हातात

वाल्मिक कराड यांचा दरबार असलेल्या जगमित्र कार्यालयाची सूत्रं यापुढे अजय मुंडेंच्या हातात

परळी(प्रतिनिधी)

    बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून आरोप व खंडणी सह मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मीक कराड यांचा दरबार असलेल्या परळी  येथील जगमित्र कार्यालयाची सूत्र या पुढे ना धंनजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आली आहेत.

   सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी व धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा या  मागण्यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आसून वाल्मिक कराडविरोधात राज्यभरात रोष वाढत असतानाच बीडमध्ये घडामोडींना वेग आला आहे, तर धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न आणि इतक कामे आधी जगमित्र कार्यालयातून वाल्मिक कराड पाहत होते संतोष देशमुख अपहरण, हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. त्याची या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. या दरम्यान वाल्मिक कराडचं परळीतील जगमित्र या कार्यालयाची सूत्रे आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे यांच्या हाती आली आहेत. वाल्मिक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे बसत असून  मतदारसंघातील कामे, नागरिकांचे प्रश्न, समस्या सध्या ते जाणून घेत असल्याची माहिती आहे.

    धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते पद देखील त्यांच्याकडे आहे. पिंपरी जिल्हा परिषद गटातून ते विजयी झाले होते. तर धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीत मतदारसंघात ते कामे पाहत होते. सध्या वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत असल्याने आणि संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच त्याच्या आणि दोन्ही पत्नीच्या नावे अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचे उघड झाले असून कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केला आहे. त्यामुळे आता कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे या सर्व पार्शवभूमीवर जगमित्र  कार्यालयाची सूत्रे कोण कोणाच्या हातात जाणार याबाबतची चर्चा होती. मात्र, अजय मुंडे यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!