शेतकऱ्यांच्या जमिनी उध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा- मोहन गुंड यांची मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी
शेतकऱ्यांच्या जमिनी उध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा- मोहन गुंड यांची मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी
केज (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या जमिनी उध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य मोहन गुंड यांनी एका निवेदना द्वारे मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात मोहन गुंड यांनी म्हंटले आहे की शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा राज्यभरातून विरोध विरोध होत आहे, या पूर्वी ही शेतकऱ्यांनी आंदोलन केली होती त्यावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. निवडणुकी नंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महामार्गाचे भूसंपादन सुरू करण्याचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. शासनाची हि दुटप्पी भूमिका आहे.
कुणाची ही मागणी नसलेला, हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त करणारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणार. शेतकरी हिताचा मूळचा 2013 भूमी अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी न करता त्यामधे शेतकरी विरोधी धोरणे घुसडून 1955 च्या कायद्याने सक्तीने भूसंपादन करून शेतकऱ्यांना भूमिहीन बेरोजगार करणारा. शक्तिपीठ महामार्ग हा रद्दच झाला पाहिजे, अनेक मोर्चे आंदोलने करून सबंधित 12 जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिलेली आहेत, सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करून शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. जिल्ह्यातील नदी काठावरून हा शक्तिपीठ जाणार असल्याने पुराचा प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे, अनेक शेतकरी भुमिहिन होणार आहेत, बागायती शेती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होणार आहे..
त्यामुळे शेतकरी हित लक्षात घेऊन हा महामार्ग रद्द करावा. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदना द्वारे मोहन गुंड यांनी दिला आहे.
Post Views: 162