अप्पर पोलीस अधीक्षक तिडके यांच्या पथकाची अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दारू भट्टयावर धाड, 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 9 आरोपीवर गुन्हा दाखल
अप्पर पोलीस अधीक्षक तिडके यांच्या पथकाची अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दारू भट्टयावर धाड, 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 9 आरोपीवर गुन्हा दाखल
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अप्पर पोलीस अधीक्षक तिडके यांच्या पथकाने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वान नदीपात्रातील डोंगरदर्यात सुरू असलेल्या दारू भट्टयावर धाड टाकून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 9 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की बीड जिल्हा पोलिस अधीक्षक पदी नवनीत कॉवत यांनी पदभार स्वीकारल्या पासून जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होत असतानाच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी मध्ये आजही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या कृपेने अवैध धंदे सुरूच असून याच पोलीस स्टेशन हद्दी मध्ये वान नदी पात्रात आज ही गावठी दारू भट्टया सुरूच आसून दिनांक 22.1.2025 रोजी दुपारी दीड वाजता अप्पर पोलीस अधीक्षक यांना माहिती मिळाल्या वरून त्या स्वतः, वाचक सपोनी ठाकूर तसेच कार्यालयातील स्टाफ यांना व दोन पंच बरोबर घेऊन वाना नदी पात्रात त्याचबरोबर नागनाथ मंदिराच्या परिसरात वेगवेगळ्या टीम करून अडीच वाजता छापा मारला असता त्या ठिकाणी काही इसम हे हातभट्टी दारू च्या भट्ट्या लावून दारू तयार करीत असल्यास निदर्शनास आले. त्या ठिकाणी अचानक छापा मारला असता दोन आरोपी जाग्यावर मिळून आले व दारूची वाहतूक करण्यासाठी एक घोडा व एक मोटरसायकल तसेच काही आरोपी डोंगरदर्याचा आश्रय घेऊन पळून गेले. मिळून आलेल्या दोन आरोपींची नावे पुढील प्रमाणे 1) बाबा कासम पप्पू वाले 2) मुस्तफा बाबा पप्पू वाले असे दोन आरोपी मिळून आले त्यांच्याकडे पळून गेलेले आरोपींची नाव गाव विचारले असता ते पुढील प्रमाणे 1) राजू गंगा चौधरी नंबर 2) अरे चंदू साखर वाले 3) अब्दुल जुम्मा चौधरी 4)इबुकसिम नुरीवाले 5)लल्लू कासम पप्पू वाले 6)नदीम लुल्स वाले 7) मगबुल राणू परसुवाले तर सर्व राहणार गवळीपुरा अंबाजोगाई. वरील एकूण 9 आरोपीकडून तयार दारू व फसफसते रसायन तसेच एक घोडा व एक मोटरसायकल असे मिळून तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई ही अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम,सोबत सपोनी ठाकूर पोह देवकते सातपुते सुरवसे, पठाण,तागड यांनी केली
