वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यास सोलापूर न्यायालयाचा दिलासा, बीड जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यास सोलापूर न्यायालयाचा दिलासा, बीड जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
सोलापूर (प्रतिनिधी)
सुशील कराडवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगत बीड न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागावी असा आदेश सोलापूर न्यायालयाने तक्रार दारास देऊन वाल्मिक कराड यांच्या मुलास काहीसा दिलासा दिला आहे.
वाल्मिक कराडच्या मॅनेंजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करणे, त्याच्या अल्पवयीन मुलीहा मारहाण करणे तसेच बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार आणि सोने नेल्याचा आरोप करण्यात आला होता. सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी पीडित मॅनेजरच्या पत्नीने सोलापुरातील सोलापूर पोलीस आयुक्त आणि बीड पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती.
दाखल केलेल्या खाजगी फिर्यादनुसार संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातला असल्याने पीडित महिलेने बीड जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचे सोलापूर न्यायालयाने आदेश देऊन सुशील कराड यास काहीसा दिलासा दिला आहे
