*पर राज्य व पर जिल्ह्यातुन आलेले मोबाईल चोरास फोरव्हिलर गाडी व 63 मोबाईल सह पोलीस नाईक तेजस वाव्हळे यांनी पाठलाग करून पकडले, वाव्हळे यांचे सर्वत्र अभिनंदन*
पर राज्य व पर जिल्ह्यातुन आलेले मोबाईल चोरास फोरव्हिलर गाडी व 63 मोबाईल सह पोलीस नाईक तेजस वाव्हळे यांनी पाठलाग करून पकडले, वाव्हळे यांचे सर्वत्र अभिनंदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
पर राज्य व पर जिल्ह्या बाहेरून आलेले मोबाईल चोरास फोरव्हिलर गाडी व 63 मोबाईल सह पाठलाग करून पोलीस नाईक तेजस वाव्हळे यांनी पकडल्या मुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या आरोपी कडून मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील रहिवासी व बीड पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक तेजस वाव्हळे हे आज काही कामा निमित्ताने अंबाजोगाई मध्ये आले असता त्यांना बस स्थानका मध्ये एक संशयित युवक फिरताना दिसला या वेळी त्यांनी त्या युवकावर नजर ठेवली असता तो बस स्थानका बाहेर आला त्या नंतर त्याला इतर 2 जण येऊन भिडले व तिघे जण मिळून वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालया च्या बाजूस उभा असलेल्या एम एच 49 सी डी 8024 क्रमांकाच्या स्विफ्ट कार मध्ये बसले व कार परळीच्या दिशेने निघाली. तेजस वाव्हळे यांनी लागलीच एका ऑटो मध्ये बसून त्या कार चा पाठलाग केला असता कार भगवान बाबा चौकातील शिंदे यांच्या पेट्रोल पंपावर सी इन जी भरण्यास थांबली. वाव्हळे यांनी ऑटो लांबच थांबवून चालत स्विफ्ट कार जवळ येऊन यातून उतरलेल्या एका युवकास पोलिसी खाक्या दाखवण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने आपण 1 मोबाईल चोरल्याचे सांगितले. दरम्यान यावेळी अन्य तीन जण त्या ठिकाण हुन पसार होण्यात यशस्वी झाले.

या युवकास नांव गाव विचारले असता त्याने तो नागपूर चा रहिवासी असल्याचे व पळून गेलेले झारखंड येथील रहिवासी असल्याचे सांगितले. वाव्हळे यांनी त्या युवकास त्याच्याच कार मध्ये बसवून कार पोलीस स्टेशन कडे घेण्यास सांगीतली. कार अण्णाभाउ साठे चौका नजीक येताच त्याने गाडी थांबवली व साहेब काहि तरी घ्या व मला सोडून द्या म्हणू लागला. वाव्हळे यांनी पुन्हा पोलिसी खाक्या दाखवला व गाडीची चेकिंग केली असता त्यात तब्बल 63 मोबाइल त्यांना मिळून आले. वाव्हळे यांनी लागलीच जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना या घटनेची खबर देऊन शहर पोलीस स्टेशनची गाडी त्या ठिकाणी मागवून घेतली व त्या चोरट्यास गाडी मोबाईल सह शहर पोलिसांच्या स्वाधिन केले.

या 63 मोबाईल पैकी 6 मोबाईल हे आय फोन असून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पोलीस नाईक तेजस वाव्हळे यांनी कर्त्यव्यावर नसतानाही केलेल्या धाडसी कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत असून या आरोपी कडून मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
