वाल्मिक कराड आणि त्याच्या टीमच्या विरोधात सर्वांत मोठा पुरावा पोलिसांच्या हाती सी सी टी व्ही फुटेजच आले समोर
वाल्मिक कराड आणि त्याच्या टीमच्या विरोधात सर्वांत मोठा पुरावा पोलिसांच्या हाती सी सी टी व्ही फुटेजच आले समोर
बीड (प्रतिनिधी)
मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे.
29 नोव्हेंबर 2024 चे हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आसून या सीसीटीव्हीच्या रुपाने खंडणी प्रकरणातला सर्वांत मोठा पुरावा मिळाल्याचे बोलले जाते.
विष्णु चाटे याच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आले होते. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे.
बसमोर आलेल्या व्हिडीओत वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी एकत्र असल्याचे दिसून येतात. दुपारी १२ वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. विष्णू चाटे याच्या कार्यालयातील हे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासांत समोर आले आहे.
दुपारी १२ वाजता आरोपींनी एकत्रित बसूनच चाटे याच्या मोबाईवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच फोनवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पोलीस एफआयआरमध्येही तसाच उल्लेख आहे.
आवादा खंडणी प्रकरण आणि देशमुख हत्या प्रकरणाचे कनेक्शन
केज तालुक्यातील मस्साजोग गावात आवादा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाकडे वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगने २ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आसून यातूनच पुढे संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास पोलीस करत आहेत.
