अंबाजोगाईत आविष्कार मेन्स वेअर दुकानाला मोठी आग, लाखोंचे नुकसान आग आटोक्यात
अंबाजोगाईत आविष्कार मेन्स वेअर दुकानाला मोठी आग, लाखोंचे नुकसान आग आटोक्यात
अंबाजोगाई –
अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलात असलेल्या अविष्कार मेन्स वेअर या कापड दुकानाला सोमवारी रात्री आग लागली. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आटोकाट प्रयत्न करून आग आटोक्यात आली असली तरी यात लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान, आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही
