पक्षाची व पक्षाच्या नेत्याची प्रतिमा कुणी मलिन करत असेल तर त्याची हकालपट्टी केली जाईल– मा ना अजित पवारांचा ईशारा
पक्षाची व पक्षाच्या नेत्याची प्रतिमा कुणी मलिन करत असेल तर त्याची हकालपट्टी केली जाईल– मा ना अजित पवारांचा ईशारा
शिर्डी (प्रतिनिधी)
पक्षाची व पक्षाच्या नेत्याची प्रतिमा मलिन होईल, अशी चुकीची कामं कोणीही करू नये जर कुणी चुकीचं काम केलं आणि ते सिद्ध झालं तर त्याची हकालपट्टी केली जाईल असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसीय शिबीर शिर्डी येथे १८ आणि १९ जानेवारी रोजी संपन्न झाले या वेळी मा ना अजित पवार हे बोलत होते. या शिबिरामध्ये नाराज असलेले छगन भुजबळ हे पहिल्या दिवशी सहभागी झाले होते तर दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे सहभागी झाले होते.
धनंजय मुंडे यांनी तिथं केलेल्या भाषणाची राज्यभर चांगलीच चर्चा झाली. या वेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. आपल्यावर महायुतीतून आणि पक्षातूनही अन्याय होतोय, असा सूर धनंजय मुंडेंचा होता. एवढंच नाही तर अजित पवारांसाठी आपण काय काय केलं, याचाही पाढा धनंजय मुंडेंनी वाचला. आपला पक्ष हा कार्यकर्ताभिमुख असला पाहिजे आणि कार्यकर्त्याच्या मागे पक्षाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
अधिवेशनाच्या शेवटी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सर्वच मुद्द्यांना स्पर्श करत आपलं संबोधन केलं. मागच्या महिन्यापासून धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय लोकांनी केलेल्या कारनाम्यांवरुन सूचक विधान केलं. चुकीचं काम करणाऱ्यांची पदावरुन हकालपट्टी केली जाईल, असं अजित पवार म्हणाले. हा इशारा धनंजय मुंडेंना होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय म्हणाले अजित पवार?
मागच्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घटनांची नोंद घेतली आहे. पक्षामध्ये आता कुठलीही गैरवर्तणूक होता कामा नये. पक्षाची, पक्षाच्या नेत्याची प्रतिमा मलिन होईल, अशी चुकीची कामं करु नका. जर कुणी चुकीचं काम केलं आणि ते सिद्ध झालं तर त्याची हकालपट्टी होणार आहे.
अजित पवारांच्या भाषणातील मुद्दे
- मतदारसंघांचा विकासासाठी आपण मागच्या युती सरकारमध्ये सहभागी झालो होते
- इथून पुढे काम करताना व्यवस्थित काम करावं लागणार आहे
- आपल्या दहा मंत्र्यांनी जास्तीचा वेळ देऊन काम करावं
- प्रत्येक आठवड्यात एखादा जिल्हा निवडून तिथे संघटनेचा कार्यक्रम होईल
- महिन्यान्याच्या एका मंगळवारी देवगिरी बंगल्यावर सगळ्या मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक. त्याला पक्षाचे जिल्हाध्यक्षसुद्धा हजर असतील
