*यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पोकलेंडची काच फोडल्या प्रकरणी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी युवका विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल*
यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पोकलेंडची काच फोडल्या प्रकरणी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी युवका विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करून पोकलेंडची काच फोडल्या प्रकरणी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी अक्षय परदेशी या युवका विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाहतूक पोलीस वैष्णव फड व पो कॉ पांडुरंग काळे हे 18 जानेवारी 2025 रोजी रात्री मोटार सायकल पेट्रोलींग करत असताना त्यांना पोलीस स्टेशन मधून कॉल आला की यश कंट्रक्शन अंबाजोगाई यांचे शिवाजी चौक ते अनुपम कॉर्नर पर्यंत काम चालु असताना एक इसम काम चालु असलेल्या ठिकाणी येऊन काम बंद करा असे म्हणुन कंपनीच्या पोकलैंडवर दगड मारत आहे असे सांगितल्याने पोकॉ फड व काळे हे घटनास्थळी धावले.
ही माहिती समजताच पोउपनि घोडके व चालक कदम हे ही अनुपम कॉर्नर येथे गेल्यावर दगड मारत असलेल्या इसमास त्यांनी त्यांचे नाव विचारले असता तो म्हणाला की, मी अक्षय परदेशी आहे तुम्ही कोण असे म्हणुन तो पोकलैंडचे सुपरवायझर व चालक यांना शिवीगाळ करत होता. तेव्हा पोलिसांनी त्याला समजाऊन सांगुन अक्षय पोलीस स्टेशनला चल असे म्हणताच त्याने पोलीस कर्मचाऱ्या सोबत हुज्जत घालू लागला व तु कोण आहेस मी पोलीस बिलीसला मोजत नाही असे म्हणुन त्याने काळे यांची गच्चीला धरून धक्काबुक्की केली त्यामध्ये काळे यांच्या गालावर त्याचे नख लागुन दुखापत झाली. तरी ही काळे हे त्याला सदर काम हे सरकारी आहे तु आडवु नकोस असे त्यास वारंवार बोलत असताना तुमचा काय संबंध आहे हे सर्व पोलीस आहेत हे त्यास माहीती असुन सुध्दा त्यांनी पोलिसांचे काही एक ऐकले नाही.
या घटनेच्या ठिकाणी मे. यश कंट्रक्शन अंबाजोगाई चे सुपर वायजर मयुर सुरेश पाटील व साईट इंजीनिअर अक्षय विष्णु पंचाळ, जेसीबी ऑपरेटर सुजीत यादव यांना पण अक्षय परदेशी याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली
या प्रकरणी पो कॉ पांडुरंग काळे यांच्या फिर्यादी वरून अक्षय रविंद्रकुमार परदेशी रा. गुरूवारपेठ अंबाजोगाई यास शासकीय अडथळा निर्माण करून मला शिवीगाळ करून गच्चीला धरून धक्का बुक्की केली या कारणास्तव अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आसून पो नी विनोद घोळवे यांचे मार्गदर्शना खाली
पो उ नी पवार हे अधिक तपास करत आहेत.
यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने ही अक्षय परदेशी विरुद्ध पोलिसात तक्रार
बालाजी संजु बिराजदार हे यश कंट्रक्शन अंबाजोगाई येथे सुपरवायझर म्हणुन ड्युटीस असुन ते रोड खोदण्याचे कामावर असताना यातील गैरअर्जदार याने फोर व्हीलर गाडीने येऊन तुम्ही काम बंद करा मला गाडी येथे लावायची आहे असे म्हणुन शिवीगाळ केली व त्यांचे सोबत असलेले सुपरवायझर राहुल बिभीषण सुरवसे याचे गच्चीला धरून धक्काबुक्की केली. व पोकलनवर दगड फेकुन मारून पोकलनचा पाठीमागील काच फोडुन पोकलनचे अंदाजे 15000/- रूपयेचे नुकसान केले. या प्रकरणी अक्षय परदेशी याचे विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नी विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ भोले हे अधिक तपास करत आहेत.
