घरफोडी करणारा सराईत मोहन मुंडे मोठया शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेने पकडला
घरफोडी करणारा सराईत मोहन मुंडे मोठया शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेने पकडला
पाच घरफोडया केल्याचे उघड
बीड (प्रतिनिधी)
अंबाजोगाई उपविभागातील दाखल होणाऱ्या चोऱ्या,घरफोडयाचा संमातर तपास करुन आरोपीचा शोध घेवुन गुन्हयातील गेला माल हस्तगत करणे बाबत आदेश वरीष्टांनी दिल्याने गोपनिय बातमीदारामार्फतीने माहीती काढुन कुख्यात सराईत दरोडेखोर हा त्याने चोरलेले सोने विकण्यासाठी परळी मध्ये येत असल्याची माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचुन मोठया शिताफीने कुख्यात दरोडेखोर मोहन दौलत मुंडे, रा.क्रांती नगर, अंबाजोगाई यास अशोक नगर कमानीजवळ झडप मारुन पकडले. त्याचे जवळ विकण्यासाठी आनलेले सोन्याचे दागीणे आढळुन आले त्यास परळी व अंबाजोगाई येथे झालेल्या घरफोडी बाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांने 05 घरफोडया केल्याचे प्राथमिक चौकशीअंती निष्पन्न झाले असुन त्यांनी पाच दिवसा घरफोडया केल्याचे कबुल केले आहे, त्याचे ताब्यातुन पोलीस ठाणे परळी ग्रामीणचे 02 गुन्हे, पोलीस ठाणे परळी शहर 01 गुन्हा, पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण 01 व पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर 01 असे असुन 05 दिवसा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आनले आहे. त्याचे ताब्यातुन एकुण 122 ग्रॅम सोने जवळपास आजचे बाजारभाव 9,00,000/- रु मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे परळी ग्रामीण यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आला आहे. सदरील आरोपी हा दारु पिण्याचे व जुगार खेळण्याचे सवईचा असुन तो दारुच्या नशेत बंद घर पाहुन कुलुप तोडुन आत मध्ये प्रवेश करुन सोने, नगदी चोरुन नेतो व मिळालेल्या पैशातुन दारु पितो व जुगार खेळतो. आरोपी मोहन दौलत मुंडे याचेवर दिवसा घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
सदरील कारवाई हि श्री नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक,बीड, श्री चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, श्री उस्मान शेख, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारोती कांबळे, बाळकृष्ण जायभाय, विकास राठोड, राजु पठाण, नितीन वडमारे, सचिन आंधळे, तुषार गायकवाड, विकी सुरवसे, देविदास जमदाडे यांनी केली आहे.
