ताज्या घडामोडी

भरधाव एस टी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 3 तरुणांना जागीच चिरडले परळी महामार्गावर भीषण अपघात

भरधाव एस टी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 3 तरुणांना जागीच चिरडले परळी महामार्गावर भीषण अपघात

बीड (प्रतिनिधी)

   बीड परळी मार्गावर पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तरुणांना आज सकाळी (19 जानेवारी) भरधाव एसटी बसने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते

   या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके अशी मृत तरुणांची नावे आहेत. पोलीस भरती करणाऱ्या 3 तरुणांच्या अपघातामुळे गावकरीही हळहळले आहेत. सिमेंटच्या रस्त्यावरून बस खाली सरकल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी गावातील पाच तरुण सकाळी रस्त्यावर व्यायाम करत होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या बसने (क्र. एमएच 14बीटी 1473) तरुणांना उडवले. दाट धुक्यामुळे हा अपघात घडला असून यात ओम सुग्रीव घोडके (वय – 19) आणि विराट बाब्रुवान घोडके (वय – 18) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुबोध मोरे (वय – 19) हा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्ता, मांसाचा सडा पडला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!