फेस बुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्याचा प्रयत्न दोघा विरुद्ध गुन्हा दाखल
फेस बुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्याचा प्रयत्न दोघा विरुद्ध गुन्हा दाखल
केज (प्रतिनिधी)
फेस बुक पोस्ट आक्षेपार्ह पोस्ट करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणाहून दोण जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, परळी येथील सुनिल फड याने मनोज जरांगे यांना उद्देशून जिजाऊ माँ साहेब आणि छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी भडकावू आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली होती. त्यावर केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील अमोल शेप याने देखील वादग्रस्त कमेंट केली आणि ” माझा नाईलाज झाल्याने ती पोस्ट डिलीट करावी लागली. ” अशी पोस्ट सोशल मीडिया आणि फेसबुकवर प्रसारित केली होती.
त्यांच्या पोस्टमुळे राजमाता जिजाऊ आणि छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे चारीत्र्यावर शिंतोडे उडवणारी असल्याने आणि सध्या बीड जिल्ह्यामध्ये जातीय विषमतेचे वाद निर्माण झालेले असल्याने दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी यातील आरोपी आमोल शेप याने फेसबुक या सोशल मिडीयावर पोस्ट केली. तसेच आरोपी सुनील फड आणि अमोल शेप याने त्या पोस्टवर कमेंट करुन प्रसार माध्यमांवर प्रसारीत करुन दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केली. म्हणून शुभम लोंढे यांनी दि. १८ जानेवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून सुनील फड आणि अमोल शेप या दोघांच्या विरुद्ध गु. रं. न. २०/२०२५ भा. न्या. सं. १८६, ३५३(२), ३५६(२) नुसार गुंगा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने हे पुढील तपास करीत आहेत.
