सरपंचास 1 लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी ममदापुर येथील तीन जना विरुद्ध गुन्हा दाखल
सरपंचास 1 लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी ममदापुर येथील तीन जना विरुद्ध गुन्हा दाखल
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शाळा दुरुस्तीला आलेल्या 4 लाखा पैकी 1 लाख रुपये आम्हाला दे म्हणून सरपंचास खंडणी मागितल्या प्रकरणी ममदापुर येथील तीन जना विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, सौ मंगल राम मामडगे या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर येथे ओबीसी महिला सरपंच असून गावातील काम करत असताना याच गावचे माझी सरपंच वसंत सोपान शिंदे यांचे चेतावणी वरून सदस्याचे ग्रामपंचायत सदस्य अनिल लालासाहेब देशमुख व चालु उपसरपंचाचे पती ज्ञानोबा श्रीमंतराव देशमुख हे संगनमत करून गावातील विकासाची कामे करत असताना त्यांना अडथळा अनत आहेत व शासकिय कार्यालयात खोट्या तक्रारी देऊन मंगल शिंदे यांच्यावर मानसिक दबाव टाकत टाकत आहेत दिनाक 16-8-2024 रोजी सकाळी 10.00 वाजता ग्रामपंचायतीचे कामे आटपवुन त्या जिल्हा परिषद शाळा ममदापुर येथिल सुरू असलेले दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी जात असलाना वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख, व ज्ञानोना श्रीमंतराव देशमुख हे शाळेचे पटांगनात आले आम्ही एकमेंकाना बालत असताना तिथे आमचे गावातील ईरफान बक्षुमिया शेख व अजय कुमार बाबासाहेब देशमुख है तिथे आले होते आमचे गावातील ईरफान बक्सुमियाँ शेख व अजय कुमार बाबासाहेब देशमुख यांचे समोर त्यांनी मंगल मांमडगे यांना शाळा दुरुस्ती करण्यासाठी चार लाख रुपये आले आहेत त्या रकमेतुन आम्हाला 1लाख रुपये दे नाही तर आम्ही तुला गावातील कोणतेच काम करु देणार नाहीत व तुझे विरुद्ध अर्ज देउन माजी सरपंच सुशिला व्यंकट ढवळे यांनी पैसे न दिल्यामुळे तिला जेल मध्ये घातले होते तसे तुला करु अशी धमकी दिली व पैसे मागितले त्याबाबत सरपंच यांनी ऑनलाईन तक्रार केली होती त्या नंतर त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख, व ज्ञानोना श्रीमंतराव देशमुख यांच्या विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सरपंचाच्या गैर कारभाराची चौकशी करण्यासाठी आम्ही केलेल्या पाठपुराव्याला चिडून सरपंचानी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा पलटवार विरोधकांनी केला आहे.
Post Views: 256