हत्याप्रकरणातील मकोका लावलेल्या ‘त्या’ आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवणार
हत्याप्रकरणातील मकोका लावलेल्या ‘त्या’ आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवणार
बीड (प्रतिनिधी)
9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आल्या नंतर याप्रकरणी कोर्टाने सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या सहा आरोपींवर मकोका लावला असून या आरोपी बाबत आता पुन्हा एकदा कोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
कोर्टाने आज या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज बीड न्यायालयात त्यांना व्हिसीद्वारे हजर केले होते. जरी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली असली तरी त्यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवले जाणार आहे. इतकेच नाही तर वाल्मिक कराड च्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी ही सुनावणी होणार होती. त्याला देखील खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तसेच, वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याने त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
