सुजित सोनी याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अवघ्या 18 तासात पकडल्या मुळे सोनी मित्रमंडळाच्या वतीने पो नी विनोद घोळवे सह सहकाऱ्यांचा सत्कार*
सुजित सोनी वर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस अवघ्या 18 तासात पकडल्या मुळे सोनी मित्रमंडळाच्या वतीने पो नी विनोद घोळवे सह सहकाऱ्यांचा सत्कार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरातील सुजित सोनी या तरुण व्यापाऱ्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या चार आरोपीला अवघ्या 18 तासात पकडण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या व स्थानिक पोलीस यंत्रणेला यश आल्या मुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून सुजित सोनी यांचे वडील श्रीकृष्ण सोनी व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद घोळवे सह त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला.
सुजित श्रीकृष्ण सोनी यांची नगर परिषद परिसरात कोलगेट सह अन्य कंपन्यांची एजन्सी असून ते बुधवारी रात्री 9 ते 9.15 च्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून घरा कडे परत जात असताना नगर परिषद परिसरात कोलगेट सह अन्य कंपन्यांची एजन्सी असलेले श्रीकृष्ण सोनी यांचा मुलगा सुजित सोनी याच्यावर अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकातील नगर परिषद व्यापारी संकुलात असलेल्या हॉटेल कोकीता च्या मागील बाजूस दुचाकी हुन आलेल्या हल्ले खोरांनी त्यांच्यावर चोरी करण्याच्या उद्देशाने कोयत्याने प्राण घातक हल्ला केला. यात त्याच्या जवळील सोन्याची अंगठी व मोबाईल काढून घेत त्याला गंभीर जखमी केले. त्यांच्या डोक्याला व हाताच्या बोटावर मार लागला आहे. त्याच्यावर लातूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आल्या नंतर त्या ठिकाणी ते उपचार घेत आसून घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी तात्काळ पोलीस यंत्रणेला आरोपीस शोधण्याची विनंती केली.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसात कलम 311, 3 (5) नुसार गुन्हा दाखल झाल्या नंतर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवीन नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर, चेतना तिडके पोलिस निरक्षक उस्मान शेख यांच्या विशेष मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनोद घोळवे बीड च्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुतळे, पोहेकॉ मारूती कांबळे, सचिन सानप, राजु पठाण, नितीन वाडमारे, शहर पोलीस स्टेशनचे स पो उ नी कांबळे, स पो नी निंलगेकर, पो हे को आवले, कॉ नागरगोजे, चादर, काळे या सर्वांच्या प्रयत्ना मधून आवघ्या 18 तासात या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले. अटक केलेल्या आरोपी मध्ये तेजस अनिल तुरुकमारे रा. स्नेहनगर अंबाजोगाई, हर्षवर्धन बाळु खांडके रा. जय भिमनगर अंबाजोगाई, कृष्णा दत्ता मुंडे रा. राजीव गांधी चौक अंबाजोगाई, अनिकेत महादेव मगर रा. महात्मा फुले नगर अंबाजोगाई यांचा समावेश असून या हल्ल्यात ताब्यात घेण्यात आलेला अनिकेत मगर हा नौकर सुजित सोनी यांच्या दुकानात नौकर म्हणून काम करत असून याच अनिकेत ने हल्ले खोराला मालकाची टीप देऊन लुटण्या साठी सहकार्य केल्याचे तपासात पुढे आले आहे.
श्रीकृष्ण सोनी मित्र मंडळाच्या वतीने पो नी विनोद घोळवे सह अन्य टीमचा सत्कार
सुजित सोनी या तरुण व्यापाऱ्यावर प्राण घातक हल्ल्यातील आरोपीस
अवघ्या 18 तासात पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश आल्या मुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून सुजित सोनी यांचे वडील श्रीकृष्ण सोनी व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, त्यांचे सहकारी
स पो उ नी ज्ञानेश्वर कांबळे व मनोज निलंगेकर, पो हे कॉ महादेव आवले, पो कॉ पांडुरंग काळे सह सर्व टीमचा सत्कार करण्यात आला. या वेळी मा नगरसेवक दिलीप काळे, मा नगरसेवक संजय गंभीरे, पत्रकार दत्तात्रय अंबेकर, गणपत नाना यादव यांच्या सह प्रशांत पोटभरे, कपिल थोटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीकृष्ण सोनी यांनी माझ्या मुलावर जीव गमवण्याची वेळ आली होती मात्र नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला असून या कामी मोलाचे सहकार्य लाभलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व 18 तासात आरोपी पकडण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या सर्व पोलीस बांधवांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
