ताज्या घडामोडी

गोळीबार करून दहशत निर्माण करू पाहणाऱ्या त्या युवकाच्या अंबाजोगाई पोलिसांनी ज्वारीच्या शेतातच आवळल्या मुसक्या

गोळीबार करून दहशत निर्माण करू पाहणाऱ्या त्या युवकाच्या अंबाजोगाई पोलिसांनी ज्वारीच्या शेतातच आवळल्या मुसक्या

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगर मधील रहिवासी नवनाथ कदम यांच्या मुलावर गोळीबार करणाऱ्या व ज्वारीच्या शेतात लपून बसलेल्या रेणापूर येथील रहिवासी गणेश पंडित चव्हाण या युवकाच्या मुसक्या अवळण्यात पोलीस निरीक्षक घोळवे व त्यांच्या पथकाला अवघ्या 6 तासात यश आले असून पोलीस पथकाचे यश आल्याने
पोलीस पथकाच्या या कार्यवाहीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
    अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगर मध्ये  रहात असलेल्या नवनाथ कदम यांच्या सिद्धेश्वर या मुलावर आज सकाळी रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर येथील रहिवासी असलेल्या गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात कोणीही जखमी झालेले नसले तरी 1 मिनिट जरी सिद्धेश्वर खिडकी मध्ये थांबला असता तर त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता.
     गणेश चव्हाण हा युवक कदम यांच्या पत्नी शेश्या कदम यांना मागील काही दिवसा पासुन त्यांच्या मुली सोबत लग्न करण्या संदर्भात सतत धमकी देत होता. काही दिवसा पूर्वी या युवकाच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशन ला तक्रार ही देण्यात आलेली असून आज सकाळी तो यांच्या घरी आला आणि खिडकी मधून सिद्धेश्वर या मुलावर गोळीबार केला. सुदैवाने ही गोळी त्याला लागली नाही व मोठा अनर्थ टळला.
     गोळी झाडणाऱ्या युवका कडे कुठलाही शस्त्र परवाना नसून त्याने घावटी कट्ट्याचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवीन नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर, चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या विशेष मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनोद घोळवे
शहर पोलीस स्टेशनचे स पो उ नी कांबळे पाटील, पो उ नी पवार, पो हे को आवले, लाड, चादर, काळे या पथकाने तात्काळ रेणापूर गाठून गोविंद नगर भागात ज्वारीच्या शेतात लपून बसलेल्या गणेश चव्हाण याच्या तीन तास शोधत व 15 की मी पाठलाग करून मुसक्या आवळल्या असून त्याला अंबाजोगाई मध्ये आणण्यात आले आसून पोलीस निरीक्षक विनोद घोळवे व पथकाने तत्परतेने केलेल्या या कार्यवाहीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!