मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा मृतदेह रस्त्यावर आढळला बीडमध्ये पुन्हा खळबळ
मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा मृतदेह रस्त्यावर आढळला बीडमध्ये पुन्हा खळबळ
केज (प्रतिनिधी
केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील एका पंजाब राज्यातील मजुराचा मृत्यू झाला आसून केज येथील रोडवर हा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
आवादा एनर्जी कंपनी, खंडणी, संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराड मोक्का या सर्व प्रकाराने केज व बीड जिल्हा देशभरात चर्चेत आलेला असताना याच आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील एका पंजाब राज्यातील मजुराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आसून केज येथील रोडवर हा मृतदेह मिळून आला आहे.
या कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पंजाब राज्यातील गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.
