अंबाजोगाई शहरातील सुजित सोनी या व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपीला अवघ्या 18 तासात पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश
अंबाजोगाई शहरातील सुजित सोनी या व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपीला अवघ्या 18 तासात पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरातील सुजित सोनी या तरुण व्यापाऱ्यावर चोरी करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपीला अवघ्या 18 तासात पकडण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या व स्थानिक पोलीस यंत्रणेला यश आले असून पोलीस यंत्रणेच्या या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सुजित श्रीकृष्ण सोनी यांची नगर परिषद परिसरात कोलगेट सह अन्य कंपन्यांची एजन्सी असून ते बुधवारी रात्री 9 ते 9.15 च्या दरम्यान आपल्या मोरेवाडी परिसरातील गोदाम मधून आपल्या दुचाकीवरून घरा कडे परत जात असताना यशवंतराव चव्हाण चौकातील नगर परिषद व्यापारी संकुलात असलेल्या हॉटेल कोकीता च्या मागील बाजूस तीन दुचाकी हुन आलेल्या हल्ले खोरांनी चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने प्राण घातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताच्या बोटावर मार लागला आहे. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याचे समजते
सुजित सोनी हे व्यापारी असल्याने त्यांना लुटण्याचा उद्देशाने हा हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. या घटनेने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली होती.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसात कलम 311, 3 (5) नुसार गुन्हा दाखल झाल्या नंतर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवीन नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर, चेतना तिडके पोलिस निरक्षक उस्मान शेख यांच्या विशेष मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनोद घोळवे बीड च्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुतळे, पोहेकॉ मारूती कांबळे, सचिन सानप, राजु पठाण, नितीन वाडमारे, शहर पोलीस स्टेशनचे स पो उ नी कांबळे, स पो नी निंलगेकर, पो हे को आवले, कॉ नागरगोजे, चादर, काळे या सर्वांच्या प्रयत्ना मधून आवघ्या 18 तासात या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले. अटक केलेल्या आरोपी मध्ये तेजस अनिल तुरुकमारे वय 17 वर्षे रा. स्नेहनगर अंबाजोगाई, हर्षवर्धन बाळु खांडके वय 17 वर्षे रा. जय भिमनगर अंबाजोगाई, कृष्णा दत्ता मुंडे वय 17 वर्षे रा. राजी गांधी चौक अंबाजोगाई, अच्युत महादेव मगर वय 17 वर्षे रा. महात्मा फुले नगर अंबाजोगाई यांचा समावेश असून गोपीनिय माहिती नुसार या पथकाने अंबाजोगाई शहरात शोध घेतला असता सर्व आरोपीला ज्याच्या त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.
नौकरच निघाला सूर्याजी पिसाळ
या हल्ल्यात ताब्यात घेण्यात आलेला अच्युत मगर हा नौकर सुजित सोनी यांच्या दुकानात नौकर म्हणून काम करत असून याच अच्युत ने हल्ले खोराला मालकाची टीप देऊन लुटण्या साठी सहकार्य केल्याचे तपासात पुढे आले आहे.
