संतोष देशमुख हत्या व मोक्का प्रकरणी वाल्मिक कराड यांना बीड सत्र न्यायालयाची 7 दिवसाची पोलीस कोठडी*
संतोष देशमुख हत्या व मोक्का प्रकरणी वाल्मिक कराड यांना बीड सत्र न्यायालयाची 7 दिवसाची पोलीस कोठडी
केज(प्रतिनिधी)
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची 15 दिवसाची पोलीस कोठडी संपल्या नंतर काल पुन्हा त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही करून एस आय टीच्या पथकाने ताब्यात घेतले. आज त्यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्या नंतर न्यायालयाने 7 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराड यांच्या नावावर पवनचक्की प्रकरणातल्या खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचवेळी त्यांच्यावर देशमुख हत्या प्रकरणात हात असल्या बाबत थेट आरोप होत होते. या सगळ्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्याने पथक कराड यांच्या मागावर होते, वाल्मिक कराड 15 दिवसा पूर्वी अतिशय नाट्यमयरित्या गुन्हे अन्वेषण विभागाला शरण आले.
त्या नंतर त्यांना केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी झालेल्या सुनावणी नंतर न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची सी आय डी कोठडी सुनावली काल ही 15 दिवसाची सी आय डी कोठडी संपल्याने कराड यांना पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले या वेळी न्याय मूर्तींनी कराड यांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र वाल्मिक कराड यांच्यावर एस आय टी ने संघटित गुन्हेगारीचा कायदा लागू केल्याने एस आय टीने त्यांना ताब्यात घेतले. आज कराड यांना बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्या नंतर एस आय टी चे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सरकार पक्षाच्या वतीने माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या अटकेसह 9 बाबीवर सरकार पक्षा तर्फे परत 10 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती मात्र न्यायमूर्ती यांनी त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या वेळी कराड यांच्या वतीने ऍड सिद्धेश्वर ठोंबरे व ऍड अशोक कवडे यांनी तर विशेष सरकारी वकील म्हणून ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले.
