परळी मध्ये निर्माण झालेल्या परस्थिती मुळे ‘देवगिरी’वरील अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे तातडीनं परळीकडं रवाना
परळी मध्ये निर्माण झालेल्या परस्थिती मुळे ‘देवगिरी’वरील अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे तातडीनं परळीकडं रवाना
मुंबई (प्रतिनिधी)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आसुन वाल्मिक कराडवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आल्या नंतर परळी मध्ये निर्माण झालेल्या परस्थिती मुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे तातडीनंं परळीकडं रवाना झाले आहेत.
मकोका कारवाईनंतर आता देशमुख हत्याप्रकरणी कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. याच दरम्यान,राजकीय घडामोडींनी वेग घेतला आसून अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी(ता.14) उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईतील त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजितदादांशी जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा केली. यात वाल्मिक कराड मोक्का कारवाई,कराड समर्थकांचं परळीतलं आंदोलन यांविषयावर सविस्तर चर्चा केली.
या भेटीनंतर धनंजय मुंडे हे तातडीने परळीकडे रवाना झाले आहेत. संतोष देशमुख हत्येचा कट रचल्याचा आरोप करत वाल्मिक कराडच्या भोवतीचा फास आवळला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सुरुवातीपासूनच ज्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे, अशा धनंजय मुंडेंवरच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून उचलून धरली जात आहे.
वाल्मिक कराडवरील मकोका कारवाईनंतर आता परळीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. कराड समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.कराडची पत्नी, आई यांनी गेल्या 12 तासांपासून रात्री उशिरापर्यंत परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.तर त्यांच्याबरोबर समर्थकही तेथून हटलेले नाही.याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी वाल्मिक कराड याच्या चार समर्थकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
प्राप्त माहिती नुसार या घटने नंतर आंदोलन स्थगित केल्याचे वृत्त आहे.
