अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामसेवकांनी कामगारांची अडवणूक थांबवावी- गजानन मुडेगावकर
अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामसेवकांनी कामगारांची अडवणूक थांबवावी- गजानन मुडेगावकर
अंबाजोगाई(प्रतिनिधी )- तालुक्यातील इमारत बांधकाम कामगार व इतर कामगारांना त्यांच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले 90 दिवसांचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत असून या मुळे कामगारांना अनेक योजनांपासुन वंचित राहावे लागत आहे तेव्हा ग्रामसेवकांनी कामगारांची अडवणूक थांबवावी अशी मागणी शिवसेना नेते गजानन मुडेगावकर यांनी केली आहे
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार व इतर कामगार मंडळातर्फे कामगारांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध साहित्य, सुविधा,योजना ,पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व विमा अशा विविध योजना राबविण्यात येतात मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे ,शहरातील कामगारांना नोंदणी करण्यासाठी नगरपरिषदा मार्फत आवश्यक 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तर ग्रामीण भागातील कामगारांना नोंदणी साठी ग्रामसेवकांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते मात्र मागील अनेक महिन्यांपासून तालुक्यातील सर्व ग्रामसेवक आम्हाला वरुनच आदेश देण्यात आलेले आहेत की हे प्रमाणपत्र देऊ नये असे सांगत कामगारांची अडवणूक करून त्यांना लाभापासुन वंचित ठेवत आहेत प्रत्यक्षात दिनांक रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना 4सप्टेंबर 2024 रोजी एका पत्राद्वारे याबाबत आदेशीत केले आहे या पत्रात असे म्हटले की, महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना जिल्हा शाखा, बीड यांचे निवेदन दि. 280/8202,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियन, डीएनई. 136 जिल्हा शाखा, बीड यांचे निवेदन दिनांक 18/7/2024,इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवा शर्ती) अधिनियम 2007 वरील विषयी संदर्भिय पत्रान्वये आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना जिल्हा शाखा, बीड यांनी निवेदन देवून कळविलेले आहे की, शासन परिपत्रकानुसार ग्रामिण भागाकरिता ग्रामसेवक यांना बांधकाम कामगारांचा 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रधिकृत माणून नेमले आहेत. परंतू सबंधित प्रामसेवकांकडून बांधकाम कामगारांची अडवणूक होत असून आम्हाला वरून आदेश आहेत असे सांगून बांधकाम कामगारांची बोळवण केली जात आहे. बांधकाम कामगारांचे हेलपाटे बंद व्हावेत तसेच ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांना नोदणीसाठी लागणारी सही व शिक्का देण्याबाबत व योग्य ते मार्गदर्शन करून कामगारांचा होणारा अर्थिक व मानसिक त्रास थांबवावा तातडीने लेखीआदेश द्यावेत अन्यथा सदर संघटना जिल्हा परिषद कार्यालयावर उग्र मोर्चा काढून आंदोलन करणार आहे,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, डीएनई. 136 जिल्हा शाखा, बीड यांचे संदर्भिय निवेदनान्वेय कळविलेले आहे की, 90 दिवसाचे काम केलेचा दाखला पडताळणीसाठी कुठल्याही प्रकारचे शासन निर्देश नसल्याने ग्रामसेवकांकडून मजूरांना प्रमाणपत्र देणार नाही म्हणून बहीष्कार टाकलेला आहे. संदर्भ क्र. 3 चे अधिनियमान्वये प्रामसेवकांनी कामगारांना प्रमाणपत्र देताना सबंधित कामगारांचा वास्तव्याचा अधिकृत पुरावा व अधिकृत फोटो असलेल्या ओळखपत्राचा नमुना अर्जासोबत घेवून बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबत सर्व स्थानिक संस्थानी आवश्यक ती कार्यवाही करावी म्हणून शासनाचे सूचना आहेत,
सबब आपणास कळविण्यात येते की, उक्त शासन तरतुदीनुसार कामगारांना 90 दिवसाचे काम केले बाबतचे प्रमाणपत्र देण्या बाबत आपले स्तरावरून ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना योग्य त्या सुचना देवून त्यांना बहिष्कारापासून परावृत्त करावे व याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी व वसे संबंधित संघटना यांना कळवावे. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी असे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांनी दिले आहेत असे असली तरी मात्र अद्यापही गटशिक्षणामध्ये गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना कोणतेही आदेश दिले नसल्यामुळे सर्वसामान्य खरे कामगारांची आडवणूक होतआहे तरी तात्काळ कामगारांना नऊ दिवसाचे प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामसेवकांना आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेना नेते तथासामाजिक कार्यकर्ते गजानन मुडेगावकर यांनी केली आहे ,असे न झाल्यास या संबंधित लवकरच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट घेऊन हा विषय मांडला जाईल तरी तात्काळ आदेशात न केल्यास प्रसंगी आंदोलनाचा इशाराही शिवसेना व कामगारांच्या वतीने देण्यात आला आहे.
