संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय, नवी SIT स्थापन नऊ अधिकाऱ्यांचा समावेश
संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय, नवी SIT स्थापन नऊ अधिकाऱ्यांचा समावेश
मुंबई (प्रतिनिधी)
संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने १ जानेवारी रोजी एस आय टी विशेष तपास पथकाची घोषणा केलेली होती मात्र देशमुख कुटु्ंबियांनी तपास पथकातील अधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदविल्यानंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेत नवे विशेष तपास पथक स्थापन केले आसून या पथकात एकूण नऊ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडालेली असताना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी याकरिता महाराष्ट्र सरकारने एस आय टी विशेष तपास पथकाची स्थापना १ जानेवारी रोजी केली होती. दोन कोटींची खंडणी आणि हत्या या दोन्हींच्या प्रकरणांच्या अनुषंगाने पथकाकडून तपास सुरू होता. मात्र विशेष तपास पथकातील अनेक अधिकाऱ्यांची वाल्मिक कराड याच्याशी दोस्ती असल्याने आणि अधिकारी-कराड यांचे फोटो समाज माध्यमांत प्रसिद्ध झाल्याने देशमुख कुटुंबियांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता.
देशमुख कुटुंबियांची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर खंडणी आणि हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या विशेष तपास पथकाची स्थापन करण्यात आली आहे.
विशेष तपास पथकात (एसआयटी) कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश
१)अनिल गुजर- पोलीस उपअधीक्षक
२) विजयसिंह जोनवाल- सहाय्यक पोलीस निरीक्षक
३) महेश विघ्ने-पोलीस उपनिरीक्षक
४) आनंद शिंदे-पोलीस उपनिरीक्षक
५) तुळशीराम जगताप- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
६) मनोज वाघ- पोलीस हवालदार
७) चंद्रकांत काळकुटे- पोलीस नाईक
८) बाळासाहेब अहंकारे-पोलीस नाईक
९) संतोष गित्ते-पोलीस शिपाई
