ताज्या घडामोडी

सा बां च्या वतीने अंबाजोगाईतील स्वा रा ती रुग्णालया कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून पूर्ण होतात न होतात तोच रस्ता रुंदीकरणाचे कामास “यश कन्स्ट्रक्शन कंपनीची यंत्रणा सज्ज”

सा बां च्या वतीने अंबाजोगाईतील स्वा रा ती रुग्णालया कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून पूर्ण होतात न होतात तोच रस्ता रुंदीकरणाचे कामास “यश कन्स्ट्रक्शन कंपनी” ची यंत्रणा सज्ज

oppo_2

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंबाजोगाई शहरातील स्वा रा ती रुग्णालया कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे आज काढण्यास सुरू होतात न होतात तोच रस्ता रुंदीकरणाचे काम करण्या साठी यश कन्स्ट्रक्शन कंपनीची यंत्रणा सज्ज झाली असून या यंत्रणेने आपल्या कामाला प्रारंभ ही केला आहे.

     केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्ना मधून अंबाजोगाई शहरातील रस्त्या साठी कोटयावधी रुपयांचा फंड उपलब्ध झाल्या मुळे शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत काही होत आहेत

    आज संत भगवान बाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे सदर बाजार, दवाखाना, मोरेवाडी मार्गे यशवंतराव चव्हाण चौक, लातूर टी पॉईंट व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रमाबाई चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या प्रमुख रस्त्यावर नव्याने बांधलेल्या नाल्यावरील अतिक्रमणा सह रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झालेली रस्त्याच्या मध्या पासून दोन्ही बाजूची 50 फुटाच्या आतील सर्व अतिक्रमणे काढण्यास छत्रपती शिवाजी महाराज चौका मधून सुरवात झाली.

   न प च्या मुख्याधिकारी आय ए एस अर्पिता हुबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, उपअभियंता गोविंद मुंडे, उप अभियंता मळेकर, उपअभियंता सचिन कावळे,  उपअभियंता गुडवाले, शाखा अभियंता गोविंद शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, स्वछता निरीक्षक अनंत वेडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत आपल्या यंत्रणेच्या वतीने अतिक्रमणे काढुन घेतली.

*यश कन्स्ट्रक्शन च्या वतीने लागलीच कामाला प्रारंभ*

oppo_2

   पोकलेन, जे सी बी, टिप्पर सह अन्य वाहनांच्या सहकार्याने या रस्त्यावरील, दोन मजली इमारती सह पत्र्याचे बांधकाम झालेली अतिक्रमणे काढणे सकाळ पासून सुरू झाले दिवस भरात बऱ्या पैकी अतिक्रमणे काढून झाल्यावर रस्ता रुंदीकरणाचे काम करण्या साठी यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा प्रदीप भेय्या ठोंबरे यांची जेसीबी, पोकलेन, टिप्पर ही सर्व यंत्र सामग्री व मनुष्यबळ सदर बाजार मधील बडा हनुमान मंदिर परिसरात येऊन धडकले.

     यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या यंत्र सामग्रीने लागलीच रस्ता रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ केला असून या मध्ये रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजक व दोन्ही बाजूस 50 फुटावर सिमेंट कॉक्रेटचे नाली बांधकाम केल्या जाणार आहे. या रस्त्याचे काम यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने होत असल्याने अत्यन्त दर्जेदार रस्ता तयार होणार असून तो पूर्ण झाल्या नंतर स्वा रा ती रुग्णालया कडे जाणाऱ्या वाहन धारकांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!