Skip to content
ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई कलापथकास प्रथम बक्षीस

अंबाजोगाई ( वार्ताहर) अंबाजोगाई जेष्ठ नागरिक संघाच्या कला पथकास महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या 34 व्या अधिवेशन लातूर येथे संपन्न झाले. या अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध 24 जेष्ठ नागरिक संघाच्या कला पथकांनी कला सादर केल्या यात ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाईच्या कलापथकास महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाईने मराठवाडा गीत सादर केले.या गीताचे नैपथ्य व कोरिओग्राफी व नेत्रत्व सौ. दीपा स्वामी यांनी केले या समूहगीतात 18 महिला व सात पुरुष 25 ज्येष्ठ कलाकारांनी सहभाग नोंदवला हे विशेष. या गीताने प्रेक्षकांची सर्वाधिक वाहवा मिळवली.
ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई संघास या कार्यक्रमात फेसकॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे व अरुण रोडे यांचे हस्ते ट्रॉफी व सर्व सहयोगी कलाकारास सहयोगी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
फेस कॉम दक्षिण मराठवाडा विभागाचे अध्यक्ष डॉक्टर दामोदर थोरात सचिव जगदीश जाजू ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई चे अध्यक्ष ऍड अनंतराव जगतकर, कार्याध्यक्ष डॉक्टर सुलभा खेडगीकर व सचिव लक्ष्मण गोरे यांनी सर्व कलाकाराचे अभिनंदन केले आहे
Post Views: 166
error: Content is protected !!