स्वामी विवेकानंद पतसंस्थेत झालेल्या अपहार प्रकरणी आरोपींना अंबाजोगाई न्यायालयाचा दणका..
स्वामी विवेकानंद पतसंस्थेत झालेल्या अपहार प्रकरणी आरोपींना अंबाजोगाई न्यायालयाचा दणका..
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरातील कधीकाळी नावाजलेल्या तसेच अंबाजोगाई-परळी तालुक्यातील शिक्षकांशी संलग्न असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेत झालेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी अटकपूर्व जामीन साठी अर्ज दाखल केलेल्या आरोपींना मा. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने दि. 10/01/2025 रोजी जमीन अर्ज नाकारून चांगलाच दणका दिला. या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी की स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेत सन 2011 ते 2017 दरम्यान 4 कोटी 85 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झालेला होता. सदर अपहार पतसंस्थेतील तत्कालीन संचालक मंडळ यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांचना हाताशी धरून केलेला होता. सदर अपहारा संदर्भात ऑडिट होऊन लेखापरीक्षक सतीश पोकळे यांनी पाच वर्ष सर्व कागदपत्राची छाननी करून सदाहर अपहार उघडकीस आणला होता. आरोपी हे राजकीय वरदहस्त असलेले व्यक्तिमत्व असल्यामुळे शासकीय नोकर असलेले सतीश पोकळे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद देऊनही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला नव्हता. परंतु पतसंस्थेत अनेक सभासदांना विनाकारण त्रास देऊन पतसंस्थेने बेकायदेशीर वसुली काढल्यामुळे व इतर सभासदांचे शेअर्स त्यावरील लाभांश व इतर रकमा न दिल्यामुळे पतसंस्थेतील सर्व सभासदांनी उठाव केल्यामुळे व माननीय अंबाजोगाई न्यायालयात वेगवेगळी प्रकरणे दाखल केल्यामुळे शेवटी तपासणीला पर्याय न उरल्यामुळे शेवटी या सर्वांवर गुन्हा दाखल झालेला होता. त्याच गुणाच्या अनुषंगाने आरोपींनी माननीय अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केलेला होता. या अर्जामध्ये पतसंस्थेचे सभासद मोहन गंगणे, बाळासाहेब धायगुडे व इतर सभासदाकडून ऍड. राजू डिघोळे, ऍड.बालाजी निंबाळकर, ऍड. माणिक आदमाने व ऍड. सारंग मुंडे यांच्या मार्फत जामीन मिळू नये म्हणून आक्षेप अर्ज दाखल करण्यात आलेला होता. तसेच सदर पतसंस्थेत परत ऑडिट होऊन आपहाराची व्याप्ती अजून वाढलेली होती. या प्रकरणात माननीय अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक दिवस सतत युक्तिवाद झालेला होता. आक्षेप अर्ज दाखल करणाऱ्या वकिलांच्या प्रभावी युक्तीवादाला व ग्राह्य धरून मा. अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश खोचे साहेब यांनी प्रस्तुत प्रकरणातील प्रकर्षाने ज्यांची नावे समोर आली अशा आरोपींचा जामीन अर्ज नाकारून पतसंस्थेतील शेकडो सभासदांना दिलासा दिलेला आहे.
या निकालामुळे आक्षेप घेणाऱ्या सभासदांचे व ज्यांच्या मार्फत आक्षेप दाखल केला होता ते ऍड. राजू डिघोळे, ऍड.बालाजी निंबाळकर, ऍड. माणिक आदमाने व ऍड. सारंग मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
FIR no 335/2024 दिनांक 14/08/2024 मधील
श्री पवार दादासाहेब नानासाहेब, श्री घुले अंगद कोंडीबा, श्री धायगुडे सुर्यकांत बाबूराव, श्री देशमुख गिरीधर दशरथ, श्री. गायकवाड शर्मा, श्री भताने शिवहार एकनाथ या संचालकाना व
बँक अधिकारी कर्मचारी पौळ बालासाहेब, श्री. काळे, श्री धायगुडे विजय या आरोपीला जामीन नामंजूर करण्यात आला आहे.
