आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर यांना जशास तसे उत्तर देऊ म्हणून धमकी देणाऱ्या रा काँ चे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण व मा आ संजय दौंड यांना काय त्यांचा खून करायचा आहे की काय?- कालिदास आपेट
आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर यांना जशास तसे उत्तर देऊ म्हणून धमकी देणाऱ्या रा काँ चे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण व मा आ संजय दौंड यांना काय त्यांचा खून करायचा आहे की काय?- कालिदास आपेट
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर यांना जशास तसे उत्तर देऊ म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण व मा आ संजय दौंड यांना नेमकं काय म्हणायचं आहे अशी धमकी देऊन त्यांना काय सुरेश धस यांचा खून करायचा आहे का?
असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी आयोजित पत्रकार परिषदे मध्ये केला.
या वेळी कालिदास आपेट यांच्या समवेत शिवसेनेचे मदन परदेशी, अ भा काँग्रेस ईश्वर शिंदे, कल्याण भगत, हनुमंत फड (रा कॉ तालुका अध्यक्ष परळी), उत्तमराव माने, अब्दुल फता पटेल, उत्तमराव माने, शाम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या अनुशंगाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे मध्ये कालिदास आपेट हे बोलत होते.
या वेळी बोलताना कालिदास आपेट म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या राजकीय कार्यकर्त्यांची हत्या असून
रा कॉ अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, संजय दौंड यांनी अंबाजोगाई मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे मध्ये खा बजरंग सोनवणे, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ नमिताताई मुंदडा, आ प्रकाश सोळंके, आ विजय सिंह पंडित ही मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात आवाज उठवत असताना त्यांच्यावर आक्षेप नोंदवला.
अन्यायाच्या विरुद्ध या मंडळीने फक्त सभागृहात आवाज उठवावा त्यांनी बाहेर भूमिका मांडू नये का? धस यांनी
पीक विमा, राख, वाळू, वीट भट्ट्या, मुरूम, या बाबत भूमिका मांडली,
सभागृहात जी भूमिका तीच भूमिका बाहेर ही ते मांडत आहेत. सुरेश धस यांचा आवाज दाबणार असाल आमचं तर नरडे दाबणार का?
शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळी राजेश्वर चव्हाण गप्प का?
मुंडे यांच्या कार्यकर्त्या कडून लक्ष विचलित करण्या साठी प्रयत्न सुरू आहेत. आरोप घेणारे संतोष देशमुख यांच्या बाजूने नाहीत का? सामान्य शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई मिळावी ही भूमिका आपली नाही का असे सवाल केले.

या वेळी आपेट यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली का? निवडणूक काळात सर्व गावात पैसे दिले मग आत्महत्या गस्त शेतकऱ्यांना मदत का दिली नाही असा सवाल ना मुंडे यांना केला.
या वेळी बोलताना मदन परदेशी म्हणाले की, सत्ताधारी मंडळींचे आरोप म्हणजे वयक्तिक स्वातंत्रावर गधा आणण्याचा प्रयत्न असून आम्ही
सर्व संतोष देशमुख यांना न्याय देणाऱ्याच्या सोबत आसून धमक्या देणारावर शासनाने कठोर भूमिका घ्यावी
या वेळी बोलताना उत्तम माने म्हणाले की, बीड हा गुंडांचा जिल्हा म्हणून देशभर ओळखला जात आहे. सत्तेतून पैसा व पैशातुन सत्ता हे गणित बनल्या गेले आहे. कुठलाही उद्योग जिल्ह्यात आला तर अगोदर आमची भेट घ्या असे फर्मान काढले जाते.
आमच्या परळीत आम्हाला जगण्याचा अधिकार राहिलेला नाही. ट्रॅक्टर, गाडी खाली घालुन लोक मारल्या जात आहेत. वंजारा समाजात 10 टक्के लुटारू आसले तरी 90 टक्के लोक चांगले आहेत.
या वेळी बोलताना ईश्वर शिंदे यांनी राजेश्वर चव्हाण यांच्यावर तोफ डागली. आबा आपली ही भूमिका पाहता येणाऱ्या काळात प्रति वाल्मिक अण्णा म्हणून आम्ही तुमच्या कडे पहायचं आहे का? आबा मराठा आरक्षण मुद्यावर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता मात्र परत जिल्हाध्यक्ष पद घेऊन मराठ्यांच्या जीवावरच उठला आहात.
आपण शरद पवार यांना धोका दिलात
आपल्या धमक्याला आम्ही आणि कोणीही घाबरणार नाहीत असेही शिंदे म्हणाले.
