*रोहित भालेकर या अल्पवयीन सतरा वर्षीय जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा संशय*
रोहित भालेकर या अल्पवयीन सतरा वर्षीय जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा संशय
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरातील रोहित भालेकर या अल्पवयीन सतरा वर्षीय जखमी युवकाचा स्वा रा ती रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील पाटील चौक परिसरात राहणारा व कधी ऑटो चालवून तर कधी मजुरी करून उदर निर्वाह करणारा रोहित शंकर भालेकर हा युवक 6 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पाटील चौक या ठिकाणीच शेकोटी ला शेकत असतानाच केंद्रे व अल्ताफ नामक या त्याच्या मित्रांनी त्याला बाहेरून येऊ म्हणून आपल्या दुचाकी वर बसवून घेऊन गेले, त्यावेळ पासून त्याचा व घरच्या मंडळींचा संपर्क तुटला होता.
काल दुपारच्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांना समजले की रोहितला मार लागल्याने स्वा रा ती रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान उपचार घेत असलेल्या रोहितचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यु झाला.
रोहितच्या डोक्यास मार लागून मृत्यू झाल्याने आणि तो ज्या केंद्रे व अल्ताफ नामक युवका सोबत गेला होता त्यांचे मोबाईल बंद येत असल्याने रोहितच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून त्याचे शवविच्छेदन सुरू आहे.
दरम्यान रोहित यास 108 अम्ब्युलेन्स ने कोणत्या ठिकाण हुन स्वा रा ती रुग्णालयात कोण आणून उपचारासाठी दाखल केले याची माहिती उपलब्ध होऊ शकली नसून सदर घटनास्थळ हे अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सरहद्दीवर असल्याने या संदर्भात दोन्ही पोलीस स्टेशन पैकी कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होतो हे पहावे लागणार आहे.
