ना अजित दादा पवार व ना धनंजय मुंडें यांच्यावर आ सुरेश धस करत असलेली टिका यापुढे खपवून घेतली जाणार नाही – रा कॉ जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचा इशारा
ना अजित दादा पवार व ना धनंजय मुंडें यांच्यावर आ सुरेश धस करत असलेली टिका यापुढे खपवून घेतली जाणार नाही – रा कॉ जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचा इशारा

पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना निरुत्तर होण्याची वेळ
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार व ना धनंजय मुंडें यांच्यावर आ सुरेश धस करत असलेली टिका यापुढे खपवून घेतली जाणार नाही
असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण सह अन्य कार्यकर्त्यांनी दिला आसून पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्यांना निरुत्तर व्हावे लागले.
संतोष देशमुख हत्ये नंतर राज्यात निर्माण झालेली परस्थिती, जनक्षोभ, भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या कडून होत असलेल्या आरोपांच्या फेऱ्या आणि यातून सत्ताधारी व विरोधी आमदारा कडून होत असलेली ना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी या मुळे मुंडे समर्थक कार्यकर्ते संतप्त झाले असुन आज अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या वतीने पत्रकार परिषदेचे अयोजन करण्यात आले होते. या वेळी राजेश्वर चव्हाण हे बोलत होते.
या वेळी आंबा साखरचे व्हा चेअरमन दत्ता आबा पाटील, माजी आ. संजय भाऊ दौंड, तालुका अध्यक्ष राजाभाऊ औताडे, गोविंद भेय्या देशमुख, विलासराव सोनवणे, ताराचंद शिंदे, अशोक सोनी, राजपाल लोमटे, वैजनाथ सोळंके, रणजित लोमटे, अजित गरड, यांच्या सह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना राजेश्वर चव्हाण म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर आम्ही स्वतः आरोपीला शिक्षा व्हावी या साठी निवेदन दिले, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी विनंती केली.
त्या नुसार आरोपीला पकडण्या साठी
176 पोलीस अधिकारी कामाला लागले. आज जवळपास सर्व आरोपी अटक ही झाले असताना मागील 8 ते10 दिवसा पासून आ. धस हे वाळू सिमेंटचा मुद्दा काढून वयक्तिक राजकारण करत आहेत.
आमदार धस साहेब, तुमचं तोंड आवरा, राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार व ना धनंजय मुंडें यांच्यावर आ सुरेश धस करत असलेली टिका यापुढे खपवून घेतली जाणार नाही. आमचे नेते काही बोगस मतदान करून निवडून आलेले नाहीत.
हा केवळ मुंडे व पवार यांचा अपमान नाही तर तमाम कार्यकर्त्यांचा अपमान आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी आपली माणसं आवरायला हवेत. बीड जिल्ह्यातील सर्व आमदारांनी डोके ठिकान्यावर ठेवायला हवे. या साठी आमचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे.
आज सोयाबीनला भाव नाही उसाला भाव नाही त्यावर जिल्ह्यातील नेते बोलत नाहीत मात्र ही मंडळी केवळ ना धनंजय मुंडे यांना टार्गेट करत असल्याने प्रभु वैद्यनाथाने तिसरा डोळा उघडला तर सर्वजन भस्म होतील अशी उपरोधात्मक टीका या वेळी चव्हाण यांनी केली.
अनेक प्रश्नावर निरुत्तर होण्याची वेळ

या वेळी पत्रकारांनी आज पर्यंत आपल्याला कधीही पत्रकारांची आठवण कशी झाली नाही वेळ आल्यावरच पत्रकार परिषद कशी घ्यावी वाटली. या सह परळी मध्ये वाळू, राख माफिया राज नाही का? आपल्या पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पक्ष प्रवेश देऊन पदाची खैरात वाटली या सह अन्य प्रश्नावर पत्रकार तुटून पडल्याने राजेश्वर चव्हाण व अन्य मंडळीस निरुत्तर होण्याची वेळ आली
