सोन्या चांदीच्या दागिन्यासह 1 लाख 34 हजार चा ऐवज लंपास करून चोरट्यांची पो नी पडवळ यांना सलामी
सोन्या चांदीच्या दागिन्यासह 1 लाख 34 हजार चा ऐवज लंपास करून चोरट्यांची पो नी पडवळ यांना सलामी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे रजेवर जातात न जातात आणि त्यांचा पदभार ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पडवळ हे घेतात न घेतात तोच चोरट्याने शहरातील जयवंती नगर या गजबजलेल्या वस्ती मध्ये धुमाकूळ घालत घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 1 लाख 34 हजार चा ऐवज लंपास करून पडवळ यांना सलामी ठोकली.
अंबाजोगाई शहरातील जयवंतीनगर परिसरातील ट्युशन एरिया मध्ये राहणारे सिताराम सोमिनाथ निरडे हे काल 5 जानेवारी रोजी त्यांचे धारूर तालुक्यातील कचारवाडी या आपल्या गावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे राहते घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉक तोडुन कपाटात ठेवलेले सोन्याचे लॉकेट 15 ग्रॅम वजनाचे जुने वापरलेले किं. 45000/-, सोन्याचे कानातील झुंबर जोड 9 ग्रॅम वजानाचे जुने वापरते किं. 28,000/-, सोन्याचे मिनी गंठन 10 ग्रॅम वजनाचे जुने वापरते किं. 30,000/-, सोन्याचे 5 ग्रॅम वजनाची अंगठी जुनी वापरती किं. 15,000/-, चांदीची गणपतीची मुर्ती 10 तोळे वजनाची जुनी वापरती कि. अं.6000/- असे एकुण 1,24,000/- रू चा सोन्याचा माल व गल्ल्यात ठेवलेले रोख 10 हजार असा एकूण 134 हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाले.
या प्रकरणी सीताराम निरडे यांच्या
फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला भा 5 गुरनं. 11/2025 कलम 331(3), 331(4),305 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि पवार हे करत आहेत.
पो नी पडवळ यांना चोरट्यांची सलामी
दरम्यान अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे रजेवर जातात न जातात आणि त्यांचा पदभार ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पडवळ हे घेतात न घेतात तोच चोरट्याने शहरातील जयवंती नगर या गजबजलेल्या वस्ती मध्ये जो धुमाकूळ घातला आणि घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 1 लाख 34 हजार चा ऐवज लंपास केला त्यामुळे पडवळ यांच्या कारभारा बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
