ताज्या घडामोडी

अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी राजकिशोर मोदी यांची निवड*

अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी राजकिशोर मोदी यांची निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी प्रदेश अध्यक्ष राजकिशोर मोदी यांची सर्वानुमते बिनविरोध पणे निवड करण्यात आली आहे. मागील महिन्यात ओंकारेश्वर येथे अखिल भारतीय सर्ववर्गीय जायसवाल महासभेची बैठक संपन्न झाली होती . या बैठकीत महाराष्ट्रासह देशभरातून जायसवाल  बांधव सहभागी झाले होते. या बैठकीत मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जायसवाल यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची निवड समिती गठीत करून यातून सर्वांनी विचार विनिमय व चर्चा करून एकमताने राजकिशोर मोदी यांची आगामी २०२५ ते २०२८ या काळासाठी जायसवाल महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे अशोक जायसवाल यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे सध्या अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला आहे. महाराष्ट्र प्रदेश जायसवाल संघटनेच्या अध्यक्ष पदाची जवाबदारीही राजकिशोर मोदी हे लिलया सांभाळत आहेत. त्यांनी प्रदेशअध्यक्ष पदाच्या कालखंडात समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे शैक्षणिक , सामाजिक तसेच आर्थिक क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे. अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक, श्री योगेश्वरी मल्टिस्टेट, श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून करत असलेल्या कार्याची दखल व समाजासाठी कार्य करण्याची धडपड लक्षात घेऊन त्यांना सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्त करण्याचे ठरवून त्यांना तशी संधी देण्यात आल्याचे एकमुखाने झाल्याचे जाहीर करण्यात आले. राजकिशोर मोदी यांनी आपल्या आजपर्यंत च्या कालखंडात महासभेच्या अनेक ठिकाणी बैठका व सामाजिक उपक्रम घेऊन समाज पुढे नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. यापुढेही त्याचप्रमाणे समाजासाठी सदैव कार्यतत्पर राहनार असल्याची भावना राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली.
अंबाजोगाई शहरात आगामी काळात अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेचे राष्ट्रीय महाअधिवेशन संपन्न होणार असून यामध्ये मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जायसवाल यांच्याकडून राजकिशोर मोदी यांचा पदग्रहण व शपथ ग्रहण सोहळा देखील संपन्न होऊन ते २०२५ ते २०२८ पदासाठी महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेऊन महासभेच्या कार्यभार सांभाळनार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात समाजातील तरुण तरुणींना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांना प्रेरित करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी सांगितले. त्याचबरोबर समाजातील सर्व वर्गीय घटकांना सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. राजकिशोर मोदी यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्याचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होऊन त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!