*ज्ञानराधा व राजस्थानीच्या ठेवी परत मिळण्यासाठी अंबाजोगाई येथे 1 जानेवारी पासून साखळी उपोषण सुरू, मागण्या मान्य न झाल्यास 9 जानेवारी पासून आत्महत्या करण्याचा इशारा*
*ज्ञानराधा व राजस्थानीच्या ठेवी परत मिळण्यासाठी अंबाजोगाई येथे 1 जानेवारी पासून साखळी उपोषण सुरू, मागण्या मान्य न झाल्यास 9 जानेवारी पासून आत्महत्या करण्याचा इशारा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ज्ञानराधा व राजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवी परत मिळवण्यासाठी अंबाजोगाई येथे 1 जानेवारी पासून साखळी उपोषण सुरू केले असून दररोज 40 ते 50 ठेवीदार उपोषणास बसत आहेत दरम्यान लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास 9 जानेवारी पासून आत्महत्या करण्याचा इशारा ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गोरे यांनी दिला आहे.
अंबाजोगाई ठेवीदार कृती समिती यांच्याकडून 3 डिसेंम्बर 24 च्या निवेदनानुसार ठेवी परत मिळाव्या या प्रमुख मागणी सह 34 मागण्या बाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर कारवाई न झाल्याने सर्व ठेवीदारांनी कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली
1 जानेवारी 2025 पासून उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषणास प्रारंभ केला असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे.
ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ज्या 34 मागण्याचे निवेदन दिलेले आहे या मध्ये प्रामुख्याने १)बट्स कायद्याचा गुन्ह्यात समावेश करावा.
२) ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ देण्यात याव्यात
३) शासनाने ठेवी साठी अर्थसंकल्पात तरतूद करून ठेवी तात्काळ द्याव्यात
४) ज्ञानराधा व राजस्थानी चे संचालक यांना तात्काळ अटक करावे.
५) एम पी आय डी चा प्रस्ताव शासनास तात्काळ पाठवावा
६) ज्ञानराधा व राजस्थानी चा तपास ई डी कडे देण्यात यावा
७) दोन्ही सोसायटीचे फॉरेन्सिक ऑडिट करावे
८) जप्त केलेल्या प्रॉपर्टीज ठेवीदारांच्या नावे जोडण्यात याव्यात
९) दोन्ही सोसायटीवर तज्ञ लेखापरीक्षक नेमावेत
१०) दोन्ही सोसायटीच्या जप्त प्रॉपर्टीज गॅझेट द्वारे प्रसिद्ध करून लिलाव करावा
११) ज्ञानराधा व राजस्थानी च्या तपासात दिशाभूल करणाऱ्यांना सह आरोपी करावे
१२) मिळून न आलेल्या आरोपींना फरारी घोषित करण्यात यावे
१३) ज्ञानराधा व राजस्थानी साठी सहारासारखे रिफंन्ड पोर्टल तयार करावे
१४) अध्यक्ष व संचालक मंडळाच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून लिलाव करावा
१५) सर्व संचालकांचे पासपोर्ट जप्त करण्यात यावेत
१६) जप्त केलेल्या प्रॉपर्टीची चोरी झालेल्या ठिकाणी पोलिसात गुन्हा नोंद करावा
१७) आरोपीचे फोन सी डी आर द्वारे त्यांना अटक करावी
१८) तात्काळ निर्णयासाठी प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे
या व इतर मागण्याचा समावेश आहे.
गेल्या सहा दिवसापासून उपोषणा चाळीस ते पन्नास ठेवीदार दररोज बसत असून मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 9.1. 2025 पासून आत्महत्या करण्याचा इशाराही निवेदनात दिलेला आहे.
