गावठी पिस्टल बाळगणाऱ्या श्रीकांत भोसले यास अंबाजोगाई पोलिसांनी ठोकल्या बेडया
गावठी पिस्टल बाळगणाऱ्या श्रीकांत भोसले यास अंबाजोगाई पोलिसांनी ठोकल्या बेडया

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या श्रीकांत भोसले यास अंबाजोगाई पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या असून शहरात आणखी काही जणां कडे गावठी पिस्टल असल्याने याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा.
संतोष देशमुख हत्ये नंतर बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा संभाळल्यापासुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्या साठी शर्तीचे प्रयत्न चालविले आसून अंबाजोगाई सह जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा एक्शन मोड वर आली आहे. बीड जिल्हयातील गुंडगीरीचे व गुन्हेगारीचे समुळ उच्चटन करण्याच्या उदात्त दृष्टीकोण डोळयासमोर ठेवून भविष्यात अवैद्य शस्त्र, वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवन आवश्यक वस्तुचा काळा बाजार करणारे व्यक्ती व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहादर, धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA, मोक्का, हद्यपार, कायद्याअंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पोलीस अधिक्षक श्री नवनीत काँवत यांनी दिलेला आहे.
पोलीस अधिक्षक श्री नवनीत काँवत,
श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, श्री अनिल चोरमले उप विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर यांनी अंबाजोगाईतील कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी या करीता शर्तीचे प्रयत्न चालविले असून दिनांक ०४/०१/२०२४ गोपनिय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे पाण्याची टाकी लातुर पॉईट येथे एक इसम गावठी पिस्टल कमरेला लावुन फिरत आहे अशी माहीती मिळाल्यावरुन पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहरचे पथक या ठिकाणी जाऊन अचानक छापा मारला असता हा इसम पळून जात असल्याने त्याचा पाठलाग करून पकडला. पकडलेल्या इसमास त्यांचे नाव गाव विचारता त्याने त्यांचे नाव श्रीकांत ऊर्फ बबलु पांडूरंग भोसले वय ४१ वर्षे रा. यशवंतराव चव्हाण चौक अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड असे सांगितले. त्यांचे ताब्यात गावठी बनावटीचे सिल्वर कलरचे पिस्टल एकुण ४०,०००/- रुपयाचा माल मिळुन आलेला आहे. त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा क्रमांक ०९/२०२५ कलम ३/२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी ही, पोलीस निरीक्षक व्हि.यु. घोळवे, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोह/१४७९ आवले, पोह/१४८५ वडकर, पोअं/२०२० नागरगोजे, पोअं/१७० काळे यांनी केली आहे.
