अलखैर पतसंस्थेच्या उर्दू व मराठी दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
अलखैर पतसंस्थेच्या उर्दू व मराठी दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुका कार्यक्षेत्र असलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने सातत्याने समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांना आपलेसे करुन त्यांचा सामाजिक व आर्थिक उत्कर्ष करण्याच्या भुमिकेतून आपले कार्य केले आहे. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आणि प्रबोधन अलखैर पतसंस्थेच्या वतीने आयोजित केले जातात त्याच अनुषंगाने दरवर्षी 31 डिसेंबर रोजी पतसंस्थेच्या उर्दू दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. परंतु यंदा अलखैर पतसंस्थेने उर्दूसोबतच मराठी दिनदर्शिक प्रकाशित करुन सर्व जाती धर्मांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या दिनदिर्शिकेचे प्रकाशन अलखैर पतसंस्थेच्या मुख्यालयात मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे मार्गदर्शक शेख अब्दुल रहीम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जनसेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ.लतीफ खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी अलखैर पतसंस्थेचे उपाध्यक्ष मुज्जमील खतीब सर यांचे चिरंजीव तज्जमुल खतीब यांची केंद्र शासनाच्या औद्योगिक संशोधन संस्थेत एएसओ पदावर निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. तर मान्यवरांच्या हस्ते उर्दू व मराठी दिनदिर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी डॉ.लतीफ खान म्हणाले की, सामाजिकदृष्ट्या आपणांकडे किती संपत्ती आहे किंवा आपण किती श्रीमंत आहोत हे पाहिले जात नाही तर आपण किती दिलदार, किती दानशूर व किती सामाजाप्रती काम करतो हे पाहिले पाहिजे परंतु प्रत्येकाचा स्वार्थ आडवा येतो म्हणून सामाजिक कार्याकडे दुर्लक्ष होत असते. परंतु सामाजिक स्तरावर अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने समाजोपयोगी उपक्रम राबविले त्याशिवाय एक सामाजिक दायित्व म्हणून समाजातील वेगवेगळ्या घटकातील जे गोरगरीब व सर्वसामान्य माणूस आहे किंवा कुटूंब आहे त्यांना आर्थिकदृष्टट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. ही मदत करत असताना कधीही जात, पात, धर्म, पंथ, पाहिला नाही उलट माणूस म्हणून प्रत्येकाला मदत व सहकार्य करण्याचे काम केले आहे. ही पतसस्था अंबाजोगाई तालुक्याचे आर्थिक क्षेत्रातील आयडियल आहे. अशा पतसंस्था हे सामाजिक कार्यात स्वतःचा ठसा उमटवित असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी शेख शाकेरभाई, मुश्ताक नदवी, जाफरसेठ, पतसंस्थेचे चेअमरन शेख उमर फारुक, उपाध्यक्ष मुजम्मील खतीब, सचिव शेख तालेब चाउस, सचालक मुजाहेदसर, संचालक रईस सिद्दीकी, बदरअली उस्मानी, मॅनेजर सय्यद रउफ, यांच्यासह इतर मान्यवर, पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी, एजेंट व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
