*संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे सह तिघांना केज न्यायालयाची 14 दिवसाची पोलीस कोठडी*
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे सह तिघांना केज न्यायालयाची 14 दिवसाची पोलीस कोठडी
केज(प्रतिनिधी)
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या आरोपींना काल पुणे येथे पकडण्यात आल्या नंतर आज या दोघासह तिघांना केज न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले वसुधीर सांगळे या दोन आरोपींना पुणे येथील बालेवाडी परिसरातुन काल रात्री अटक केल्या नंतर त्याची जुजबी चौकशी करून विशेष पथक त्यांना केजचा घेऊन आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे सह तिघे जण घटनेच्या दिवशी पासून फरार होते. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केल्या नंतर या प्रकरणाच्या तपासाला गती आली आणि या आरोपीला फरार करण्यास सहकार्य केल्या मुळे डॉ वायबसे यांना ताब्यात घेतल्या नंतर फरार आरोपीच्या मार्गावर पोलीस पोचले आणि फरार आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोन जणांना काल रात्री पकडले.
सिद्धार्थ सोनवणे यालाही केले कोर्टात हाजर
म्हणतात ना घर का भेंदी लंका जालें या प्रमाणे सूर्याजी पिसाळ असलेला मस्सा जोग येथील रहिवासी सिधार्थ सोनवणे हा घटने दिवशी संतोष देशमुख यांच्या लोकेशनचे अपडेट देत होता या सोनवणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून घुले व सांगळे यांच्या सोबत आज सोनवणे याला न्याया लया समोर हजर करण्यात आले.
*आरोपींना केज न्यायालयाची 14 दिवसाची पोलीस कोठडी*
सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या आरोपीस केज मध्ये घेऊन येत असल्याचे समजताच त्यांना पाहण्या साठी पोलीस स्टेशन व कोर्ट परिसरात एकच गर्दी झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमानावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्यांना सर्व प्रथम केज पोलीस स्टेशन ला आणण्यात आले. त्या नंतर केज उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी झालेल्या सुनावणी नंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
न्या श्रीमती एस व्ही पावसकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वतीने ऍड तिडके तर सरकार पक्षा तर्फे ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली.
