संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे डॉक्टर वायबसे सी आय डी च्या ताब्यात
संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे डॉक्टर वायबसे सी आय डी च्या ताब्यात
बीड (प्रतिनिधी)
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली असून सुदर्शन घुले सह फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टर वायबसे यांना सी आय डी च्या लोकांनी ताब्यात घेतले आहे.
बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपींना फरार घोषित करून सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे वाँटेड असल्याचं पोलिसांनी जाहीर केलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय. या आरोपींची माहिती देणा-याला योग्य बक्षीसही दिलं जाणार आहे. मात्र, आरोपींना अटक करण्यात पोलीस आणि सीआयडी यांना अपयश येत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, फरार आरोपींबाबत मोठी अपडेट समोर आली आसून या प्रकरणी बीडमधील डॉ वायबसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या फरार आरोपीना पळून जाण्यात मदत केल्याचा संशय डॉ वायबसे यांच्यावर आहे. वायबसे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वायबसे आणि इतर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
