*डॉ.राजेश इंगोले यांना आयएमएचा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान*.
*डॉ.राजेश इंगोले यांना आयएमएचा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान*.
*_डॉ.राजेश इंगोले यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन_*

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
इंडीयन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समिती अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांना इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या ‘नॅशनल प्रेसिडेंटस ऍंप्रेसिएशन अवॉर्ड फॉर बेस्ट कल्चरल ऍक्टिव्हिटी’ या अत्यंत सन्मानाचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान केला गेला आहे. इंडीयन मेडीकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याबद्दल व समिती तर्फे महाराष्ट्रातील डॉक्टर्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची पावती त्यांना राष्ट्रीय स्तरावर मिळाली आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत हा पुरस्कार फक्त डॉ.राजेश इंगोले यांना मिळाला आहे. त्याबद्दल डॉ.इंगोले यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
यापूर्वीही डॉ.इंगोले यांना इंडीयन मेडीकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा व अत्यंत प्रतिष्ठेचा असा राज्यस्तरीय डॉ.सुरेश नाडकर्णी व आय.एम.ए.एम.एस प्रेसिडेंट ऍप्रेंसिएशन अवॉर्डस फॉर बेस्ट कल्चरल ऍक्टिव्हिटी या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच अंबाजोगाई शाखेचे अध्यक्षपद भूषविताना त्यांना आय.एम.एचे दोनदा बेस्ट प्रेसिडेंट व दोनदा बेस्ट ब्रँच हे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
सांस्कृतिक समितीच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपद भूषवितांना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर्ससाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी पुणे येथे साहित्यिक डॉक्टर्ससाठी पहिल्यांदाच ‘शब्दशारदा साहित्य संमेलन’ भरवले होते. तसेच त्यांनी गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रिल्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्ससाठी एक सशक्त व्यासपीठ निर्माण करून वैद्यकीय क्षेत्रात सांस्कृतिक चळवळ गतिमान केली. त्यांच्या या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांना इंडीयन मेडिकल असोसिएशन राष्ट्रीय कार्यकारणीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या या अभिनमानस्पद कामगिरीबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे. या पुरस्कारांबद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले की, इंडीयन मेडीकल असोसिएशनचा अत्यंत प्रतिष्ठेचा व ज्या पुरस्काराचे स्वप्नं संघटनेचा प्रत्येक डॉक्टर पाहतो हा पुरस्कार मला मिळाला हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. संघटनेने माझ्या सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन हा राष्ट्रीय पुरस्कार मला दिला. याचे श्रेय मला नेहमीच तोलामोलाची साथ व सहकार्य देणारे डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.विजय लाड, डॉ.बळीराम मुंडे, डॉ.योगेश मुळे,डॉ अरुणा केंद्रे, डॉ नितीन पोतदार, डॉ नितीन चाटे, डॉ स्नेहल होळंबे, डॉ ऐश्वर्या चव्हाण, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.श्रीनिवास रेड्डी यांच्यासह जेष्ठ मार्गदर्शक डॉ.सुधीर देशमुख, डॉ.दिलीप खेडगीकर, डॉ.एन.पी.देशपांडे, डॉ.उत्तम निसाले, डॉ.शैलेश वैद्य, यांच्यासह सर्व आयएमएच्या जेष्ठ आणि श्रेष्ठ साथीदारांचे आहे. हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. सांस्कृतिक समितीचे अध्यक्षपद भूषविताना या कार्यात मला साथ देणाऱ्या सांस्कृतीक समिती सदस्य डॉ.गितांजली शर्मा, डॉ.तुकाराम मुंढे, डॉ.मोहिनी गानू, डॉ.वृंदा कुलकर्णी, डॉ.राजश्री सावंत, डॉ.माया भालेराव, डॉ.प्रज्ञा किनगावकर, डॉ.प्रफुल्ल जटाळे, डॉ.राजन जोशी, डॉ.वैष्णवी पाटील, डॉ.पल्लवी दोडके, डॉ.सारंग दराडे यांना हा पुरस्कार मी समर्पित करतो असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले. हे यश माझ्या विविध संकल्पनांना मूर्त स्वरूप देणाऱ्या या सर्व साथीदारांचे आहेत त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. असेच कार्य पुढे करीत राहील अशी आपणांस ग्वाही देतो. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले. पुरस्कार वितरणाचा शानदार भव्य कार्यक्रम हैदराबाद येथे शताब्दी संमेलन केंद्र, हैद्राबाद येथे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टी असोकन, राष्ट्रीय सचिव डॉ.अनिलकुमार जे.नायक तसेच नूतन अध्यक्ष जगप्रसिद्ध एआई हॉस्पिटलचे संचालक डॉ दिलीप भानुशाली यांच्या हस्ते दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी प्रदान करण्यात आला.
डॉ.राजेश इंगोले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संतोष कदम, सचिव डॉ.अनिल आव्हाड, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर, डॉ.जयेश लेले, डॉ.अनिल पाचनेकर, डॉ.सुहास पिंगळे, माजी राज्याध्यक्ष डॉ.दिनेश ठाकरे, माजी राज्यसचिव डॉ.सौरभ संजनवाला माजी अध्यक्ष डॉ.रवींद्र कुटे, डॉ.रामकृष्ण लोंढे, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ.संजय पाटील,डॉ संजय कदम, डॉ.रंजन संचेती, डॉ.मीनाक्षी कुलकर्णी,डॉ राजू इंगळे, डॉ.स्नेहलता पटवर्धन, डॉ.राजीव जेथलिया, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मिळालेल्या पदाला झोकून देऊन न्याय देण्याची व प्रभावी कार्य करण्याची डॉ.राजेश इंगोले यांची शैली त्या पदाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. तसेच त्या पदाला वलय प्राप्त करून देते व त्या पदाला डॉ.इंगोले हे योग्य न्याय देतात असे मत राष्ट्रीय सचिव डॉ.अनिलकुमार जे.नायक तसेच सर्व राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी या निमित्ताने व्यक्त करत भविष्यात डॉ राजेश इंगोले यांना राष्ट्रीय पातळीवर संघटनेची मोठी जबाबदारी देण्यात येईल असे सूतोवाच केले.
=======================
=======================
