ताज्या घडामोडी

बीड जिल्ह्यातील वाळू आणि राखेचे माफिया राज समोर आल्या नंतर वाळूमाफियांना वेसण घालण्या साठी महसूल विभागाचा मोठा निर्णय

बीड जिल्ह्यातील वाळू आणि राखेचे माफिया राज समोर आल्या नंतर वाळूमाफियांना वेसण घालण्या साठी महसूल विभागाचा मोठा निर्णय

   मुंबई (प्रतिनिधी)

   बीड जिल्ह्यातील राख आणि वाळू माफियाचे गौडबंगाल समोर आल्या नंतर राज्यातील वाळूमाफियांना वेसण घालण्यासाठी फडणवीस सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.

   महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाचा हा मोठा निर्णय आहे. राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाने ठोस पावले उचललली आहेत. राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी आणि गौण खनिजांच्या नियमनात अधिक कार्यक्षमतेसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील विभागाने आता गौण खनिजासंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याआधी हे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे असायचे, परंतु वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि नियमन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

   महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे धोरण राज्यातील वाळू माफियांवर प्रभावीपणे नियंत्रण आणणे. गौण खनिज उत्खनन प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायदेशीरता सुनिश्चित करणे.
जिल्हास्तरावर निर्णय प्रक्रियेत सुसूत्रता आणणे असे आहे.

हा निर्णय तातडीने लागू करण्यात येणार

राज्यातील गौण खनिजांचे नियमन अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार देण्यामुळे वाळू उत्खननासंबंधी अनियमितता कमी होईल, तसेच वाळू माफियांवर कठोर कारवाई करता येईल. या निर्णयामुळे सामान्य जनतेला न्याय मिळेल आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल. हा निर्णय तातडीने लागू करण्यात येणार आहे, आणि जिल्हा प्रशासनांना यासंबंधी आवश्यक त्या सूचना देऊन परिपत्रक महसूल विभागाने जारी केलं आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाई

अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गावातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी त्यांची स्वतःची यंत्रणाही तयार केली असून ही यंत्रणाच आता महसूलच्या जीवावर उठली आहे. या लढाईत महसूल यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे. राज्यातील शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी लहान मोठ्या नद्यांच्या पात्रातून अमर्यादपणे वाळूचा उपसा होत आहे. पूर्वी गावातील छोट्या मोठ्या बांधकामांपर्यंत मर्यादीत असणारी वाळूची मागणी प्रचंड वाढली आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रांनी शिरकाव केला आहे. जेसीबी, पोकलेन, यांत्रिक बोटी अशा यंत्रांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू उपसून शहरांकडे पाठवली जात आहे. अवैधरित्या वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसून प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!