*संतोष देशमुख हत्या प्रकरणी एस आय टीची स्थापना करण्यात आल्याने आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळण्याची शक्यता*
संतोष देशमुख हत्या प्रकरणी एस आय टीची स्थापना करण्यात आल्याने आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळण्याची शक्यता
बीड (प्रतिनिधी)
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासासाठी शासनाकडून विशेष तपास पथकाची एस आय टीची स्थापना करण्यात आल्या नंतर या प्रकरणातील आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईसाठी सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे. सरकारने या प्रकरणात संतोष देशमुख प्रकरणात एसआयटीची स्थापना केली आहे. बुधवारी एसआयटीची स्थापना केल्याचे जाहीर केले. या विशेष तपास पथकात ९ सदस्यांचा समावेश आहे. या ९ सदस्यांमध्ये पोलीस अधिकारी आणि अमंलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्य ढवळून निघाल्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी शासनाकडे विशेष तपास पथकात काही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ९ जणांची नियुक्ती विशेष तपास पथकात करण्यात आली आहे. यामुळे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्या ९ सदस्यांची नियुक्ती?
पोलीस उप अधीक्षक अनिल गुजर
सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग शिवलाल जोनवाल
पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने
पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे
सहायक पोलीस उप निरीक्षक तुळशीराम जगताप
पोलीस हवासलदार मनोज वाघ
पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे
पोलीस नाईक बाळासाहेब अंहकारे
पोलीस शिपाई संतोष गित्ते
