बीड जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस केज तालुक्यातील आणखी एका माजी सरपंचास अपहरण करुन अडीच लाख रुपयाला लुटले
बीड जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस केज तालुक्यातील आणखी एका माजी सरपंचास अपहरण करुन अडीच लाख रुपयाला लुटले
बीड (प्रतिनिधी)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाने राज्यात खळबळ माजलेली असतानाच बीड जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आसून आणखी एका माजी सरपंचाचे अपहरण करुन त्याला अडीच लाख रुपयास लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप तीन आरोपी फरार आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता बीड जिल्ह्यात पुन्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून केज तालुक्यातील एक माजी सरपंच पायात कुलूप घातलेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला आसुन ज्ञानेश्वर इंगळे असं त्यांच नाव आहे. ते केज तालुक्यातील कळंब अंबा येथील रहिवासी आहेत. ना पंकजाताई मुंडे यांच्याकडून 20 लाखाच्या फंडाचे पत्र आणायचे त्यासाठी 10 टक्के रक्कम म्हणून 2 लाख रु सोबत घ्यायला लावून दत्ता तांदळे नामक व्यक्तीने केज मधील कळंब चौकातून मुंबईला जायचे म्हणून इंगळे यास फोरव्हीलर गाडीत बसवले. पाटोदा जवळ गेल्यानंतर तांदळे याने इंगळे यास रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात नेऊन दोन लाख 7 हजार रोख व फोन पे मधील 51 हजार असे साधारण अडीच लाख रुपये काढून घेत एका खोलीत हात आणि पाय बांधून डांबून ठेवले. कशीतरी सुटका करून इंगळे त्या ठिकाणहुन पळून आले असे त्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात इंगळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या माजी सरपंचाच्या पायात कुलूप लावलेले दिसत आहे. तर हाताला बांधलेले वण दिसत आहेत. यामुळे खळबळ उडाली असून याचा पोलीस तपास घेत आहेत.